Home /News /sport /

वीरेंद्र सेहवागला आठवले 'अच्छे दिन' Photo शेअर करत म्हणाला...

वीरेंद्र सेहवागला आठवले 'अच्छे दिन' Photo शेअर करत म्हणाला...

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याच्या हटके शैलीतील पोस्ट या नेहमीच व्हायरल होत असतात. सेहवागनं नुकताच एक फोटो शेअर केला असून सध्या तो चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 31 जुलै : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) क्रिकेटच्या मैदानात आक्रमक बॅटींगसाठी प्रसिद्ध होता. सेहवाग आता क्रिकेटमधून रिटायर झाला असला तरी सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याच्या हटके शैलीतील पोस्ट या नेहमीच व्हायरल होत असतात. सेहवागनं नुकताच एक फोटो शेअर केला असून सध्या तो चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. सेहवागनं त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये तो सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि युवराज सिंहसह दिसत आहे. 'अच्छे दिन थे' असं कॅप्शन या फोटोला सेहवागनं दिलं आहे. सेहवागच्या या फोटोमधील सर्व खेळाडू दिग्गज असून त्यांचा आजही त्यांच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. सेहवागनं हा फोटो शेअर करताच क्रिकेट फॅन्सच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. भारतीय फॅन्सनी हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईक केला असून त्यांच्या या खेळाडूंच्या संबंधी आठवणी देखील सांगितल्या आहेत. मॅच फिक्सिंगच्या खडतर काळात भारतीय क्रिकेटला नवी उभारी देण्याचे काम या पाच दिग्गज क्रिकेटपटूंनी केलं.
  मोठी बातमी! ... तर इंग्लंडचे क्रिकेटपटू टाकणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बहिष्कार सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टीमनं 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत धडक मारली होती. त्यामध्ये या खेळाडूंचा सहभाग होता. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय या दिग्गजांनी मिळवून दिले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Photo viral, Virender sehwag

  पुढील बातम्या