Home /News /sport /

क्रिकेटनंतर सिनेमातही दिसणार सेहवागची फटकेबाजी! वीरुच्या वक्तव्यानंतर फॅन्स गोंधळले

क्रिकेटनंतर सिनेमातही दिसणार सेहवागची फटकेबाजी! वीरुच्या वक्तव्यानंतर फॅन्स गोंधळले

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या आगामी सिनेमात काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    मुंबई, 23 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा त्याच्या मजेदार प्रतिक्रियांसाठी ओळखला जातो. सध्या तो एका लाईव्ह कार्यक्रमातील प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहे. चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या सिनेमात आपण काम करणार असल्याचं सेहवागनं  या कार्यक्रमात मजेत सांगितलं. त्यानंतर त्यानं हे वक्तव्य  गांभिर्यानं केलं आहे की मजेत? याची चर्चा फॅन्समध्ये सुरू झाली आहे. सेहवागनं 'क्रिकबझ' वरील कार्यक्रमात गौरव कपूरला सांगितलं की, 'मी माझं खानं अर्धवट सोडलं. राजकुमार हिरानी खूपच जबरदस्त चित्रपट बनवत आहेत. ते मला  चित्रपटाची कथा ऐकवत होते. मी आत्तापर्यंत अर्धीच कथा ऐकली आहे.' सेहवागच्या या वक्तव्यानंतर तो सिनेमात काम करणार आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. शुभमन गिलला दिला सल्ला या कार्यक्रमात सेहवागनं केकेआरचा बॅट्समन शुभमन गिल (Shubman Gill) याला सल्ला दिला आहे. 'गिलनं कोणताही दबाव न घेता बॅटींग केली पाहिजे. त्याला टीमच्या स्कोअरची चिंता करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर 9 बॅट्समन खेळणार आहेत हे त्यानं लक्षात ठेवावं. त्यामुळे  त्यानं फार विचार करु नये. त्याला खराब बॉल मिळाला की त्यावर मोठा फटका मारावा.' असा सल्ला सेहवागनं गिलला दिला. गिलकडं क्रिकेटमधील अनेक महान खेळाडूंपेक्षा अधिक क्षमता आहे. त्याला यशस्वी बॅटर व्हायचं असेल तर मानसिकता बदलण्याची गरज आहे. टी20 हा प्रकार बॅटरसाठी आहे,' असं सेहवागनं सांगितलं. 'एका मॅचनं तुला काही फरक पडणार नाही', KKR नं रोहितला दिला न खेळण्याचा सल्ला कोलकाताचा होणार मुंबईशी मुकाबला आयपीएल स्पर्धेत गुरूवारी शुभमन गिलच्या  कोलकाता नाईट रायडर्सची लढत मुंबई इंडियन्सशी (KKR vs MI) होणार आहे. मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या चौथ्या तर कोलकाताची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. आता आयपीएलमधील प्रत्येत मॅच महत्त्वाची आहे. IPL 2021: शिखर धवनचा सलग 6 व्या वर्षी रेकॉर्ड, विराट-रोहितला टाकलं मागं त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्स विरुद्धचा रेकॉर्डही खूप खराब आहे. कोलकातानं मुंबई विरुद्ध शेवटच्या 13 पैकी 12 मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे या लढतीत सेहवागच्या सल्ल्याप्रमाणे गिल मुक्त फटकेबाजी करतो का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या