Home /News /sport /

Virat vs BCCI वादावर हर्षा भोगलेंची प्रतिक्रिया, राहुल द्रविडचं नाव घेत म्हणाले...

Virat vs BCCI वादावर हर्षा भोगलेंची प्रतिक्रिया, राहुल द्रविडचं नाव घेत म्हणाले...

विराट कोहलीच्या (Virat Kohli) स्फोटक पत्रकार परिषदेचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या संपूर्ण प्रकरणात कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्यांनी यामध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचं नाव आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 डिसेंबर :  विराट कोहलीच्या (Virat Kohli) स्फोटक पत्रकार परिषदेचे पडसाद अद्याप उमटत आहेत. टीम इंडियाच्या कॅप्टनसीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केलेलं वक्तव्य विराटने खोडून काढले. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.  या संपूर्ण प्रकरणात कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हर्षा भोगले यांनी या प्रकरणात ट्विट्स करत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या ट्विट्समध्ये टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव घेतलं आहे. हर्षानं ट्विट करत म्हंटलं आहे की, 'भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांमधील या विषयाला दोन व्यक्तींमधील वाद असे पाहिले जाऊ नये. हा वाद सार्वजनिक होण्याऐवजी खासगी पद्धतीने सोडवण्यावर भर दिला पाहिजे.  त्यासाठी दोन्ही बाजूंनी संवाद आवश्यक आहे. 'राहुल द्रविडसाठी ही विचित्र परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये त्याच्या मॅनेजमेंट कौशल्याची परीक्षा होणार आहे. कारण, दक्षिण आफ्रिकेत जिंकण्यासाठी टीम इंडियाला आनंदी आणि सकारात्मक कॅप्टन तसंच सर्वश्रेष्ठ बॅटरची गरज आहे. हा वाद दोन्ही गटांसाठी हानीकारक आहे. भारतीय क्रिकेट टीमला मजबूत व्हावं लागेल. आपल्याला पूर्ण सत्य माहिती नसेल तर सार्वजनिक व्यासपीठावर निष्कर्ष काढणे हे धोकादायक आहे. हे मी अनुभवातून सांगतो.' असे हर्षा भोगले म्हणाले. टीम इंडियाने आजवर दक्षिण आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. 29 वर्षांचा हा इतिहास बदलण्याची संधी विराट कोहलीला आहे. विराटच्या पत्रकार परिषदेनंतर त्यावर उत्तर देण्यास गांगुली यांनी नकार दिला आहे. या प्रकरणात दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरच गांगुली बोलण्याची शक्यता आहे. स्मिथच्या सहकाऱ्याची कमाल, थेट डॉन ब्रॅडमनना टाकलं मागं!
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Rahul dravid, Sourav ganguly, Virat kohli

    पुढील बातम्या