विराटनं सोडला मांसाहार, शाकाहारी बनण्यामागे हे आहे खरं कारण

विराटनं सोडला मांसाहार, शाकाहारी बनण्यामागे हे आहे खरं कारण

क्रिकेटर विराट कोहलीनंही आता डाएटबद्दल एक निर्णय घेतलाय.

  • Share this:

मुंबई, 7 आॅक्टोबर : सेलिब्रिटीज नेहमीच डाएटविषयी काळजी घेत असतात. चांगल्या फिटनेससाठी नेहमीच जागरुक असतात. स्टार आणि खेळाडू यात अग्रेसर असतात. क्रिकेटर विराट कोहलीनंही आता डाएटबद्दल एक निर्णय घेतलाय.

विराटनं मांसाहार सोडलाय. टाईम्स आॅफ इंडियाच्या बातमीनुसार विराटनं गेले चार महिने अॅनिमल प्रोटिन खाणं बंद केलंय. त्यानं विगन डाएट सुरू केलंय. फक्त मांस, मच्छी, अंडी सोडली नाहीत तर, त्यात प्राण्यांपासून मिळणारं दूध, दही, तूप सगळंच त्यानं बंद केलंय.

यामुळे आपला खेळ सुधारल्याचं तो म्हणालाय. सध्या त्याचा भर प्रोटिन शेक, भाज्या आणि सोया यांच्यावर असतो. सूत्रांच्या माहिनीनुसार यामुळे त्याची पचनशक्ती वाढलीय. त्याला आता मांस, मासे आवडतंही नाहीत.

काही दिवसांपूर्वी त्याची बायको अनुष्का शर्माही शाकाहारी बनली होती. कोहलीही याचा विचार करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार आता त्याला जास्त मजबूत वाटतंय.

अनुष्का शर्मा आमि विराटचे बंध नेहमीच दिसत असतात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात डुबलेत. ते एकमेकांचा आदरही करतात. मध्यंतरी, अनुष्का केबीसीत आली होती. तेव्हा बिग बी म्हणाले, टीव्हीवर जे दिसतं ते आम्ही सगळं पाहतो. अनुष्कानं विराटला दिलेल्या फ्लाइंग किसबद्दलच ते म्हणत होते. तशी त्यांनी अॅक्शनही करून दाखवली.

अनुष्का शर्मा हिचा चक्क बोलका पुतळा सिंगापुरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणारे. हा पुतळा संग्रहालयात येणाऱ्या चाहत्यांशी गप्पाही मारणारे. अशा प्रकारचा बोलका पुतळा असणारी अनुष्का बॉलिवूडची पहिलीच अभिनेत्री असेल. सेल्फीसाठी हातात मोबाईल घेतलेल्या लूकमध्ये हा पुतळा तयार करण्यात येणार असून सेल्फीसाठी जवळ येणाऱ्या चाहत्यांशी तो संवाद साधेल.

Big Boss 12 : गोविंदानं नाॅमिनेट केलं शाहरुख खानला!

First published: October 7, 2018, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading