• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • युजवेंद्र चहलच्या पत्नीनं RCB ला नाचवलं, विराट ते ABD पर्यंत सारे सहभागी! पाहा VIDEO

युजवेंद्र चहलच्या पत्नीनं RCB ला नाचवलं, विराट ते ABD पर्यंत सारे सहभागी! पाहा VIDEO

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) यापूर्वी एक म्युझिक व्हिडीओ शेअर असून यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) ते एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) पर्यंत सर्व प्रमुख खेळाडूंनी डान्स केला आहे

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: आयपीएल 2022 स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनचे  (IPL 2022 Mega Auction) आता सर्वांना वेध लागले आहेत. या मेगा ऑक्शननंतर सर्व टीमची रचना बदलणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) यापूर्वी एक म्युझिक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये टीमचे प्रमुख खेळाडू सहभागी झाले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) ते एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) पर्यंत आरसीबीच्या खेळाडूंनी या व्हिडीओत डान्स केला आहे. आरसीबीचा स्पिन बॉलर  युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिनं या व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. Never Give Up. Don’t Back Down. अशी या व्हिडीओची कॅच लाईन आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि एबीडीसह ग्लेन मॅक्सवेल, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज हे प्रमुख खेळाडू सहभागी झाले आहेत. हरीश उपाध्याय यांनी या व्हिडीओला संगीत दिले आहे. या व्हिडीओत हसल डान्स स्टेपवर सर्वांनीच धमाल केली आहे. आरसीबीचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलिर्सनं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी हा व्हिडीओ शूट केलेला असावा. #PLAYBOLD ही आरसीबीची कॅचलाईन आहे. 'या संकल्पनेवर सर्व खेळाडूंचा विश्वास आहे. ते जगाला दाखवण्यासाठी आणि आमच्या मानसिकतेचे सेलिब्रेशन करण्याची आमची इच्छा होती. हा व्हिडीओ टीमचे सर्व सदस्य आणि या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या फॅन्सना समर्पित आहे,' अशी माहिती आरसीबीचे उपाध्यक्ष राजेश मेनन यांनी दिली आहे. Halal Furor: टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवर BCCI नं अखेर मौन सोडलं! आरसीबीला या आयपीएल सिझनमध्येही (IPL 2020) पहिल्या विजेतेपदानं हुलकावणी दिली. त्यांच्या टीमनं प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. पण पुन्हा एकदा क्वालिफायरचा अडथळा पार करण्यात त्यांना अपयश आलं. विराट कोहलीनं (Virat Kohli) आता आरसीबीची कॅप्टनसी सोडली आहे. त्यामुळे आगामी सिझनमध्ये नव्या कॅप्टनची नियुक्ती टीम मॅनेजमेंटला करावी लागेल.
  Published by:News18 Desk
  First published: