मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित शर्माच्या 'संगीत' कार्यक्रमात विराटनं केला होता सोनाक्षीसोबत डान्स, VIRAL VIDEO

रोहित शर्माच्या 'संगीत' कार्यक्रमात विराटनं केला होता सोनाक्षीसोबत डान्स, VIRAL VIDEO

टीम इंडियाचा वन-डे आणि टी20 कॅप्टन रोहित शर्माच्या लग्नाचा आज (सोमवारी) वाढदिवस आहे. रोहितच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात विराट कोहलीच्या डान्सचा व्हिडीओ आता व्हायरल (Virat Kohli Dance Viral Video) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : टीम इंडियाचा वन-डे आणि टी20 कॅप्टन रोहित शर्माच्या लग्नाचा आज (सोमवारी) वाढदिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 2015 रोजी रोहितनं रितिका सजदेहसोबत (Ritika Sajdeh) लग्न केले होते. आज त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली असून त्यांना एक मुलगी देखील आहे. रोहित शर्माच्या लग्नाच्या वाढदिवशी एक व्हिडीओ जुना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितच्या लग्नातील संगीत कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत विराट कोहली (Virat Kohli) डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत विराट कोहली बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सोबत डान्स करताना दिसत आहे. या कार्यक्रमात विराटनं पांढ्या रंगाचा पठाणी स्टाईल  झब्बा-पायजमा घातला असून तो सोनाक्षी सोबत ‘साड़ी के फॉल सा कभी मॅच किया रे’ या गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडीओ अधिकृत असल्याचा दावा न्यूज 18 करत नाही. पण, सोशल मीडियावर रोहित आणि रितिकाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

विराट कोहलीला डान्सची आवड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने हरभजन सिंग, युवराज सिंह यांच्या लग्नात देखील भरपूर डान्स केला होता. क्रिकेटच्या मैदानातही त्याने अनेकदा डान्स केला असून त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

रोहित-रितिकाची लव्हस्टोरी

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांची लव्ह स्टोरी ही एखाद्या फिल्मी स्टोरीसारखी आहे. रितिका रोहितची मॅनेजर होती. रोहितने यापूर्वी रितिकाची भेट कशी झाली हे अनेक मुलाखतीमध्ये सांगितले आहे. रोहित जाहिरातीचे शूट करत असताना त्याच्यासोबत कुणीही मॅनेजर नव्हता. त्यामुळे त्याला त्रास होत होता. रोहितचा हा त्रास पाहून रितिका पुढे आली आणि तिने त्याला मदत केली.

PSL 7: डिमोशन होताच पाकिस्तानचा क्रिकेटपटू संतापला, टोकाचा निर्णय जाहीर

त्यानंतर रोहित आणि रितिका हे सुरुवातीला चांगले मित्र बनले. तब्बल 6 वर्ष डेटिंग केल्यानंतर 2015 साली त्यांनी लग्न केले.  या लग्नात अजिंक्य रहाणे, युवराज सिंह, शिखर धवन, प्रग्यान ओझा, राहुल शर्मा या क्रिकेटपटूंसह सलमान खान आणि सोहेन खान हे बॉलिवूड अभिनेते देखील उपस्थित होते.

First published:

Tags: Rohit sharma, Video Viral On Social Media, Virat kohli