आणखी एक 'विराट' खेळी, पूर्ण केलं शतकांचं अर्धशतक !

आणखी एक 'विराट' खेळी, पूर्ण केलं शतकांचं अर्धशतक !

टेस्ट क्रिकेटमध्ये विराटनं 18 सेंच्युरीज केल्यात. तर वन-डेमध्ये त्याच्या नावावर 32 सेंच्युरीज आहेत.

  • Share this:

20 नोव्हेंबर : भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं पाचव्या दिवशी कोलकात्त्याच मैदान गाजवलं. विराटच्या खेळीनं फॅन्सचे पैसे वसूल झालेच पण आता विराटने शतकांचं अर्धशतकही पूर्ण केलंय. तसंच लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्याशीही बरोबरी साधलीये.

शानदार सिक्सबरोबरच विराटनं आपल्या खात्यात आणखी एका टेस्ट सेंच्युरीची भर घातली. विराटच्या नावावर आता 18 टेस्ट सेंच्युरीज झाल्यात.

महत्त्वाचं म्हणजे कोलकात्ता टेस्टमध्ये भारतीय टीम संकटात असतांना विराटनं पाय रोवून बॅटिंग केली. आणि गरज पडताच वेग वाढवत लंकेच्या बॉलर्सची चांगली धुलाई केली आणि फक्त 119 बॉल्समध्ये विराटनं सेंच्युरी पूर्ण केली.

विराट कोहलीनं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरीजची हाफ सेंच्युरी केलीय.  टेस्ट क्रिकेटमध्ये विराटनं 18 सेंच्युरीज केल्यात. तर वन-डेमध्ये त्याच्या नावावर  32 सेंच्युरीज आहेत.  त्यासोबतच विराटनं सुनील गावस्कर यांच्याही रेकॉर्डची बरोबरी केलीये. टेस्ट कॅप्टन म्हणून सर्वाधिक 11 सेंच्युरीजचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्या रेकॉर्डचीही विराटनं बरोबरी केलीये. सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराटला सध्यातरी कुणी थांबवू शकत नाही असंच दिसतंय.

 विराटाचा रेकाॅर्ड

                          सामने              धावा         शतक

कसोटी                 61              4762      18

 एकदिवसीय     202             9030         32

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 08:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading