मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाचा विकेट किपर वरण-भाताबरोबर खातो आईसक्रिम! विराटनं उघड केलं रहस्य

टीम इंडियाचा विकेट किपर वरण-भाताबरोबर खातो आईसक्रिम! विराटनं उघड केलं रहस्य

Cricket New:  टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं भारतीय टीममधील विकेट किपरच्या जेवणाचं रहस्य उघड केलं आहे.

Cricket New: टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं भारतीय टीममधील विकेट किपरच्या जेवणाचं रहस्य उघड केलं आहे.

Cricket New: टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं भारतीय टीममधील विकेट किपरच्या जेवणाचं रहस्य उघड केलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 ऑक्टोबर : क्रिकेटपटूंच्या आवडी-निवडी काय आहेत? त्याचं राहणीमान कसं आहे? त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.सोशल मीडियावरूनही याबद्दलच्या सर्व अपडेटस त्यांना वेळोवेळी मिळतात. तर कधी त्यांचे सहकारी देखील एखादं महत्त्वाचं गुपीत उघड करतात. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं विकेट किपर ऋद्धीमान साहच्या जेवणातली एक विचित्र सवय उघड केली आहे. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

विराट कोहलीनं ‘One 8 Commune’ हा त्याचा नवीन उपक्रम सुरू केलाय. याच्या प्रमोशनसाठी युट्यूबवर एक व्हिडिओ टाकण्यात आलाय. यात त्यानं साहाच्या अनोख्या सवयीचा उल्लेख केलाय.ड्रेसिंग रूममधील बरेच मजेदार किस्सेही त्याने शेअर केले आहेत. साहा हा जेवण करताना वरण-भाताच्या प्रत्येक घासाबरोबर आईस्क्रिम खातो. हा प्रकार तो कधी तरी नाही तर नेहमी करतो असं विराटनं सांगितलं. जेवणामध्ये विविध पदार्थ एकत्र करत खाण्याच्या साहाच्या सवयीची कुणीही बरोबरी करू शकत नाही, असं

असं असतं साहाचं ताट

साहाच्या ताटात आपण एकदा बटर चिकन, चपाती, सॅलेड आणि रसगुल्ले वाढलेले होते. चपातीच्या 2 ते 3 तुकड्यांसोबत सॅलेड तो खात होता. तसंच त्याने एका घासात आख्खा रसगुल्लाही खाल्ला. याशिवाय वरण-भाताच्या प्रत्येक घासाबरोबर तो आईस्क्रिम खात होता. यावर विराटनं त्याला जेवणाच्या अनोख्या पद्धतीबद्दल विचारलं असता साहानं मी असंच जेवण करतो, असं सांगितलं होतं. ही आठवण विराटने या व्हिडिओत सांगितली आहे.

ठरलेल्या वेळेत का सुरु होणार नाही भारत-दक्षिण आफ्रिका वन डे? BCCI ने दिली ही अपडेट

पॅरिसमध्ये फजिती

जेवणाच्या बाबतीत घडलेले प्रसंग विराटनं या युट्युबवरील व्हिडिओत शेअर केले. पॅरिसला गेल्यानंतर तिथं सर्वांत वाईट अनुभव आला. शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी तो काळ एका वाईट स्वप्नाप्रमाणं असतो. अनेक ठिकाणी शोधूनही शाकाहारी जेवण तिथं मिळालं नाही. भाषेची अडचण असल्यानंही खूप त्रास सहन करावा लागला, असं विराट म्हणाला.

मॅच फिनिशर की पॉवर प्ले स्पेशालिस्ट? वर्ल्ड कपमध्ये या बॅट्समनचा काय असणार रोल?

भुतान उत्तम

पॅरिसचा अनुभव वाईट होता, असं सांगताना विराटनं त्याच्या मुलाखतीत भूतानचं नाव घेऊन त्या देशाचं कौतुक केलं. तो म्हणाला, ‘एकदा भूतानला जाण्याचा योग आला. तिथं सेंद्रीय पद्धतीनं शेती केली जाते. शेतात उगवलेली सेंद्रीय भाजी आणि तांदूळ हे पदार्थ जेवणात असतात. त्याची चवही वेगळ्या प्रकारची होती. भूतानमध्ये शेती करताना रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. त्यामुळे तेथील लोक दीर्घ काळापर्यंत निरोगी राहतात. खाण्याबाबतचा जीवनातील सर्वात चांगला अनुभव तिथं आल्याचं विराटनं या व्हिडीओत सांगितले.

First published:

Tags: Cricket, Team india, Virat kohli