मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 2 कारणांमुळे घेतला कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय, विराटनं केला खुलासा

IPL 2021: 2 कारणांमुळे घेतला कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय, विराटनं केला खुलासा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मागच्या महिन्यात टी20 प्रकारातील कॅप्टनसी सोडणार असल्याचं जाहीर करत क्रिकेट विश्वाला धक्का दिला होता. विराटनं आता या निर्णयामागील दोन कारणांचा खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑक्टोबर: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मागच्या महिन्यात दोन मोठे निर्णय जाहीर करत क्रिकेट विश्वाला धक्का दिला होता. त्यानं सुरूवातीला टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) या प्रकारातील टीम इंडियाची कॅप्टनसी सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ आयपीएल स्पर्धेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमची कॅप्टनसी सोडण्याचीही घोषणा केली. विराटनं या निर्णयाची 2 कारणं सांगितली आहेत.

कॅप्टनसी सोडण्याचं सर्वात मोठं कारण हे वर्कलोड आहे, असं विराटनं सांगितलं. विराट गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा तीन्ही प्रकारातील कॅप्टन आहे. त्याचबरोबर तो आरसीबीचाही कॅप्टन आहे. त्याचबरोबर मी माझ्या जबाबदारीशी अप्रामाणिक राहू शकत नाही, असंही विराटनं स्पष्ट केलं. 'मी या 120 टक्के योगदान देऊ शकत नसेल तर पदावर चिकटून राहण्यात मला काहीही स्वारस्य नाही,' असं विराटनं स्पष्ट केलं.

विराटनं कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करतानाही वर्कलोडचा मुद्दा स्पष्ट केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कामगिरीतही घसरण झाली आहे. तसंच टीम इंडियाला आजवर एकही आयसीसी ट्रॉफी किंवा आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात विराटला आजवर अपयश आले आहे.

2 वर्षांपूर्वीच विराटनं केला होता कॅप्टनसी सोडण्याचा विचार, टीम मॅनेजमेंटबद्दल म्हणाला...

विराटच्या कॅप्टनसीवरही सातत्यानं प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर विराटनं टी20 प्रकारात कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली आहे. यापूढे बॅटींगमध्ये टीमसाठी योगदार देणार असल्याचं त्यानं सांगितलं. विराटच्या कॅप्टनसीमध्ये या आयपीएलमध्ये आरसीबीनं आजवर समाधानकारक कामगिरी केली आहे.

'जुना' धोनी बघून कॅप्टन कोहली खूश! माहीची बॅटिंग बघून विराटने मारल्या उड्या

आरसीबीनं 14 मॅचमध्ये 9 विजयासह 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आयपीएल प्ले ऑफमध्ये आरसीबीची लढत कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) होणार आहे.  विराटच्या कॅप्टनसीमध्ये आरसीबीला आयपीएल विजेतेपद मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. मात्र त्यासाठी टीमला आणखी तीन मॅच जिंकणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021, Virat kohli