मुंबई, 17 जानेवारी : विराट कोहली (Virat Kohli) हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) पराभूत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराटनं कॅप्टन पदाचा राजीनामा दिला. विराटच्या कार्यकाळात भारतीय टीम सातव्या नंबरवरून पहिल्या नंबरवर पोहचली. तसेच सलग 5 वर्ष टेस्टमधील बेस्ट टीम होती. या सर्व उपलब्धीनंतरही विराटनं अचानक टोकाचा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले. विराट कोहलीला कॅप्टन म्हणून निरोपाची मॅच देण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने दिला होता, असे वृत्त आहे.
'हिंदुस्थान टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, 'विराट कोहलीने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. त्यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बंगळुरूमध्ये कॅप्टन म्हणून शेवटची टेस्ट खेळण्याचा प्रस्ताव विराटला दिला होता. विराटने तो प्रस्ताव फेटाळला. 'एका मॅचनं काहीही फरक पडत नाही. मी तसा नाही.' असे उत्तर विराटने या अधिकाऱ्याला दिले.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात बंगळुरूमध्ये होणारी टेस्ट ही विराटच्या कारकिर्दीमधील 100 वी टेस्ट मॅच आहे. श्रीलंकेची टीम फेब्रुवारी महिन्यात भारतामध्ये येणार आहे. दोन्ही देशांमध्ये 2 टेस्ट आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला टेस्ट 25 फेब्रुवारी रोजी सुरू होईल. विराट या टेस्टमध्ये खेळला तर ती त्याची 100 वी टेस्ट मॅच असेल. विराट दुखापतीमुळे जोहान्सबर्ग टेस्ट खेळू शकला नाही. अन्यथा त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतच हा टप्पा पूर्ण केला असता.
IPL 2022 Auction : श्रेयस अय्यर होणार मालामाल, 3 आयपीएल टीम लावणार मोठी बोली
विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने 68 पैकी 40 टेस्ट जिंकल्या. यानंतर धोनीने 60 पैकी 27 टेस्ट जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा विराट हा पहिला आशियाई कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्येही टेस्ट सीरिज जिंकली. इंग्लंडमधील पाच टेस्टची सीरिज कोरोनामुळे स्थगित होण्यापूर्वी त्यामध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. तर विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारताने मायदेशात एकही टेस्ट सीरिज गमावली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.