मुंबई, 2 डिसेंबर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील आगामी सीरिज ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हायरंटमुळे संकटात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार टीम इंडिया 9 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होती. तसंच 17 डिसेंबर रोजी पहिली टेस्ट सुरू होणार आहे. मात्र अद्याप टेस्ट सीरिजसाठी टीमची घोषणा झालेली नाही. या सर्व विषयावर टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूझीलंड विरुद्धची दुसरी आणि शेवटची टेस्ट शुक्रवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या टेस्टच्या आदल्या दिवशी मीडियाशी बोलताना विराटनं सांगितलं की, 'आम्ही बीसीसीसीआयशी चर्चा करत आहोत. आम्हाला आणखी काही स्पष्टीकरण हवं आहे. येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे. राहुल भाई (द्रविड) यांनी सर्व सिनिअर खेळाडूंशी चर्चा केली आहे. ही सामान्य परिस्थिती नाही. आम्ही टीममधील सर्व सदस्यांशी चर्चा केली आहे. आमच्या मनात कोणताही गोंधळ नाही.
कधी होणार निर्णय?
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा एक आठवड्यासाठी स्थगित केला जाणार असल्याचं वृत्त आहे. बीसीसीआयनं याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. नव्या वेळापत्रकानुसार भारतीय टीम 15 किंवा 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची शनिवारी कोलकातामध्ये सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये याबाबत चर्चा होणार असून रविवारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची आशा आहे.
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या एका दिवसात दुप्पट केस, अनुष्का शर्मा म्हणाली...
टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला अद्याप केंद्र सरकारनं मान्यता दिलेली नाही. या विषयावर बीसीसीआय केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहे. ओमिक्रॉननंतर अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेशी संपर्क तात्पुरता स्थगित केला आहे. पण, बीसीसीआय अजूनही क्रिकेट दौऱ्याबाबत आग्रही आहे. टीम इंडिया A सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. या टीमला बीसीसीआयनं परत बोलावलें नाही. 3 अनधिकृत टेस्ट मॅचचा त्यांचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india, Virat kohli