मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup, IND vs NZ: विराट कोहलीचा फॉर्म पाहून विल्यमसनची उडणार झोप! VIDEO

T20 World Cup, IND vs NZ: विराट कोहलीचा फॉर्म पाहून विल्यमसनची उडणार झोप! VIDEO

टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची मॅच (India vs New Zealand) महत्त्वाची असणार आहे. भारतीय खेळाडू या मॅचसाठी जोरदार प्रॅक्टीस करत आहेत. कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील तयारीला लागला असून तो नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 29 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाची सुरूवात पराभवानं झाली आहे. सुपर 12 मधील पहिल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडिाचा 10 विकेट्सनं पराभव (India vs Pakistan) केला. या पराभवानंतर रविवारी होणारी न्यूझीलंडविरुद्धची मॅच (India vs New Zealand) महत्त्वाची असणार आहे. भारतीय खेळाडू या मॅचसाठी जोरदार प्रॅक्टीस करत आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील तयारीला लागला असून तो नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहे.

आयसीसीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये विराट कोहली फटकेबाजीचा सराव करत आहे. तर इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा सराव पाहत आहेत. यावेळी विराटची फटकेबाजी पाहून इशान किशन आश्चर्यचकीत झाला.

विराट कोहलीच्या नेट प्रॅक्टीसचा हा व्हिडीओ एकाच तासांमध्ये साडेचार लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. तर त्यावर 1100 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. विराटनं पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 57 रनची खेळी केली होती. पण, त्याला टीम इंडियाच्या अन्य बॅटर्सकडून विशेष साथ मिळाली नाही.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

विल्यमसनची उडणार झोप

आयपीएल स्पर्धेत बॅटनं फार कमाल करु न शकलेल्या विराटनं टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. त्याचबरोबर तो या नेट प्रॅक्टीसमध्येही चांगलाच टचमध्ये दिसतोय. विराटची ही फटकेबाजी पाहून न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनची झोप उडणार आहे.

T20 World Cup: Online Trolling चं लक्ष्य झाल्यानंतर मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विराट कोहलीमध्ये एकहाती मॅच संपवण्याची क्षमता असून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याची सरारासरी 50 पेक्षा जास्त आहे. पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळ करत त्यानं फॉर्ममध्ये आल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे रविवारच्या मॅचमध्ये विराटला रोखण्यासाठी विल्यमसनला विशेष डावपेच आखावे लागतील.

First published:

Tags: T20 world cup, Video viral, Virat kohli