मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहली आता टेस्ट टीमचीही कॅप्टनसी सोडणार! जाणून घ्या 5 कारणं

विराट कोहली आता टेस्ट टीमचीही कॅप्टनसी सोडणार! जाणून घ्या 5 कारणं

विराट कोहली (Virat Kohli) आता फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. पण, लवकरच तो हे पद देखाल सोडण्याची शक्यता आहे. विराट हा निर्णय का घेऊ शकतो, याची 5 कारणे आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) आता फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. पण, लवकरच तो हे पद देखाल सोडण्याची शक्यता आहे. विराट हा निर्णय का घेऊ शकतो, याची 5 कारणे आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) आता फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. पण, लवकरच तो हे पद देखाल सोडण्याची शक्यता आहे. विराट हा निर्णय का घेऊ शकतो, याची 5 कारणे आहेत.

मुंबई, 9 डिसेंबर : टीम इंडियाच्या वन-डे टीमच्या कॅप्टनपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. विराटने वर्क लोडचे कारण देत टी20 टीमची कॅप्टनसी सोडली होती. त्यानंतर वन-डे आणि टेस्ट टीमच्या कॅप्टनपदी कायम राहण्याची त्याची इच्छा होती. पण निवड समितीनं त्याची वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरून हकालपट्टी केली आहे. विराट आता फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. पण, लवकरच तो हे पद देखाल सोडण्याची शक्यता आहे. विराट हा निर्णय का घेऊ शकतो, याची 5 कारणे आहेत.

पहिलं कारण : विराटने नोव्हेंबर 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले नाही.  त्यामुळे स्वत:वरील दबाव कमी करत कॅप्टनसीवर अधिक फोकस करण्यासाठी विराट हा निर्णय घेऊ शकतो. न्यूझीलंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये विराटला 2 इनिंगमध्ये बॅटनं कमाल करता आली नव्हती.

दुसरं कारण: टीम इंडियाचे मावळते हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याशी विराटचे खास कनेक्शन होते. शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) हेड कोच झाला आहे. द्रविडने पदभार स्वीकारताच विराटची दोन टीमची कॅप्टनसी गेली आहे. त्यामुळे त्याला आता टेस्टमध्ये कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल.

तिसरं कारण: विराटनं आजवर नेहमी मानसिक आरोग्य आणि वर्कलोड मॅनेजमेंट या विषयांवर भर दिसा आहे. खेळाडूंना दीर्घकाळ बायो-बबलमध्ये राहणे सोपे नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे टीम इंडियाला सातत्याने आंतरराष्ट्रीय सीरिज खेळणे भाग आहे. विराट टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडण्याचं हे देखील मोठं कारण आहे.

ICC ट्रॉफी न जिंकल्यामुळे विराट कोहलीला मिळाली शिक्षा

चौथं कारण : विराट कोहलीची वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरून हकालपट्टा करण्यात आली आहे. निवड समितीचा त्याच्यावरील विश्वास कमी झाल्याचं हे उदाहरण आहे. विराट आता टीम निवडीबाबत विशिष्ट खेळाडूंचा आग्रह अधिक जोरदारपणे करू शकणार नाही. रोहित शर्माची टेस्ट टीमच्या व्हाईस कॅप्टनपदी झालेल्या नियुक्तीचा निर्णय हा या गोष्टीचा इशारा आहे.

पाचवं कारण : विराट कॅप्टन म्हणून तीन्ही फॉर्मेटमध्ये यशस्वी झाला. पण, तो मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला होता. आता बदललेल्या परिस्थितीत ही स्पर्धा जिंकण्याचा अधिक दबाव त्याच्यावर असेल.

First published:
top videos

    Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli