S M L

सर्व खेळ सारखेच, फुटबाॅल सामनेही पाहा, कोहलीचंही आवाहन

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2018 06:29 PM IST

सर्व खेळ सारखेच, फुटबाॅल सामनेही पाहा, कोहलीचंही आवाहन

04 जून : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं भारतीय फुटबॉल संघाचे सामने पाहण्यासाठी स्टेडिअमवर येण्याचे आवाहन केलंय.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं प्रेक्षकांना फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर येण्याचे आवाहन केलं होतं. या आवाहनाला पाठिंबा देत प्रेक्षकांना विराट कोहलीनंही विनंती केली आहे.

भारतीय संघ फिफा रॅँकिंगमध्ये ९७ व्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तीनवेळा हॅट्ट्रिक केली.

कोहली म्हणतो, ' सुनील माझा चांगला मित्र आहे. आपण सर्वांनी फुटबॉल संघाने घेतलेल्या कष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर यायला हवे. सर्वच खेळांवर प्रेम करणारा देश म्हणून भारताचे नाव जगभर व्हायला हवे़'

 

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचं आवाहन

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 06:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close