• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'ये चांद सा रोशन चेहरा', विराट-अनुष्काच्या डान्सचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?

'ये चांद सा रोशन चेहरा', विराट-अनुष्काच्या डान्सचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?

विराटनं (Virat Kohli) नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये तो अनुष्काच्या (Anushka Sharma) सौंदर्याची प्रशंसा करत आहे. त्याचबरोबर त्यानं तिच्यासोबत नाच देखील केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑगस्ट : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anuska Sharma) हे दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात.  विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.  इंग्लंड विरुद्धची पाच टेस्ट मॅचची मालिका 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत इंग्लंडमध्येच आहे. विराटनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये तो अनुष्काच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहे. त्याचबरोबर त्यानं तिच्यासोबत नाच देखील केला आहे. एका जाहिरातीसाठी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.  विराट आणि अनुष्का बऱ्याच काळानंतर एकत्र जाहिरात करत आहेत. विराटनं या व्हिडीओमध्ये गाणं देखील म्हंटलं असून अनुष्काच्या चेहऱ्याचती तुलना चंद्राच्या प्रकाशाशी केली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अनुष्का विराटला तू माझ्याकडं एकटक का पाहत आहेस? असा प्रश्न विचारते.त्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन म्हणतो, 'ये चांद सा रोशन चेहरा', पुढं विराट आणि अनुष्का एकत्र नाच करतात आणि गाणं म्हणतात. या व्हिडीओमध्ये विराटनं ब्लॅक ब्लेझर आणि पांढरा शर्ट घातला आहे. तर अनुष्कानं गुलाबी रंगाचा वन-पीस घातला असून त्यामध्ये ती सुंदर दिसली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

  The Great Wall of India! भारतीय गोल किपरचं ऑस्ट्रेलियाकडून कौतुक, वॉर्नर म्हणाला... विराट आणि अनुष्कानं नुकताच इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेतला आहे. त्या सुट्टीतील वेगवेगळी फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. भारतीय टीममधील अन्य खेळाडूंसोबतही हे जोडपं सहलीला गेलं होतं. अनुष्कानं काही दिवसांपूर्वी डरहॅममधील एक फोटो  शेअर केला असून त्यामध्ये अनुष्का आणि विराटसह केएल राहुल, आथिया शेट्टी, इशांत शर्मा आणि त्याची पत्नी तसंच उमेश यादव आणि त्याची पत्नी एकत्र होते.
  Published by:News18 Desk
  First published: