'विराट'चा नवा विक्रम, 'हा' रेकाॅर्ड करणारा ठरला 11 वा खेळाडू !

'विराट'चा नवा विक्रम, 'हा' रेकाॅर्ड करणारा ठरला 11 वा खेळाडू !

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. आजच्या कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडणार विराट भारतातला 11वा खेळाडू ठरला आहे.

  • Share this:

02 डिसेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. आजच्या कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडणार विराट भारतातला 11वा खेळाडू ठरला आहे.

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात 63वा कसोटी सामना रंगला होता, त्यात विराटने 31व्या षटकामध्ये 5000 धावांची मजल गाठली. जगातील सर्वात तरुण फलंदाज असणारा विराट हा भारतासाठी 5000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा 11वा खेळाडू ठरला आहे.

टीम इंडियासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यातून 15921 धावा केल्या होत्या त्यात 51 शतके होती.

'विराट' रेकाॅर्ड

- विराट कोहलीने 63 कसोटी सामन्यात 105 डावांमध्ये 5000 धावा केल्या आहेत.

- गावसकर यांनी 52 सामन्यांतून 95 डावात, तर सेहवागने 59 कसोटी सामन्यांतून 99 डावांत 5000 धावा केल्यात.

- सचिन तेंडुलकरने 67 सामन्यांमधून 103 डावात 5000 धावांचा डोंगर रचला. तर राहुल द्रविडने 63 सामन्यांतून 108 डावांमध्ये 5000 धावा मिळवल्या.

- मात्र ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डॉन ब्रॅडमन याने 36 सामन्यांमधून 56 डावांमध्ये 5000 धावा केल्या आहेत.

'विराट' रेकाॅर्ड

'विराट' रेकाॅर्ड

विराटच्या या 5000 धावांचे वैशिष्ट्य

जुलै 2011 मध्ये, विराटला वेस्ट इंडिजविरुद्ध किंगस्टनच्या कसोटीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, पण या दौऱ्यातील अपयशामुळे त्याला संघातून निवृत्त व्हावं लागलं.

त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाता आले नाही. पण यामुळे विराट खचला नाही. इंग्लंड टीमने भारताचा 4-0 ने पराभव केला तेव्हा निवड समितीने पुन्हा विराट विश्वास टाकला आणि टीममध्ये पुन्हा संधी दिली. मुंबईतील वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याने 57.50 च्या सरासरीने 115 धावा करून आॅस्ट्रेलिया दौऱ्याचे तिकीट पक्कं केलं.

विराटचा खरा रंग जगासमोर तेव्हा आला जेव्हा 2011-12च्या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यात सचिन, द्रविड, सेहवाग आणि लक्ष्मण यांच्यासारखे खेळाडू मैदानात होते.

त्यावेळेस विराटने ऍडीलेड कसोटीत पहिल्या डावातच 116 धावा केल्या होत्या. यामुळे त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीला एक वेगळ वळणं मिळालं आणि त्याने टीम इंडियाच्या टीममध्ये एक उत्तम स्थान मिळवलं.

2014-15च्या दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना, धोनी अचानक कसोटी सामन्यातून निवृत्त झाला आणि तिथेच विराटसाठी कर्णधार बनण्याचा मार्ग मिळाला. आणि आता मात्र विराटने 63व्या कसोटीत 52च्या सरासरीने 5000 धावा काढल्या असून त्यात 20 शतकांचा समावेश आहे.

First published: December 2, 2017, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading