पंतच्या विक्रमी खेळीनंतर विराट कोहलीनं केलं कौतुक

पंतच्या विक्रमी खेळीनंतर विराट कोहलीनं केलं कौतुक

सलामीवर शिखर धवन आणि केएल राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसरा टी20 सामना जिंकला.

  • Share this:

गयाना, 07 ऑगस्ट : विंडीजविरुद्धची तीन टी20 सामन्याची मालिका भारताने 3-0 ने जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात भारताने ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 गडी राखून विंडीजला पराभूत केलं. या सामन्यातील संघाच्या कामगिरीवर विराट कोहली खूश दिसला. त्यानं यष्टीरक्षक ऋषभ पंतचं कौतुक केलं. पंतने तिसऱ्या टी20 सामन्यात 42 चेंडूत 65 धावांची तडाखेबाज खेळी केली. कर्णधार विराट कोहलीसोबत महत्त्वपूर्ण अशी 106 धावांची शतकी भागिदारी करून संघाला विजयाच्या समीप नेलं.

सामन्यानंतर विराट कोहलीला ऋषभ पंतच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. विराट म्हणाला की, आम्ही त्याला भविष्य म्हणून बघत आहोत. त्याच्याकडे भरपूर क्षमता आणि प्रतिभा आहे. आम्ही त्याला वेळ देऊ इच्छितो. त्याच्यावर कोणताही दबाव टाकायचा नाही.

पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच काढता आल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र त्यानं तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं. भारताच्या यष्टीरक्षकानं एका टी20 सामन्यात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

पंतचं कौतुक करताना विराट म्हणाला की, तो मोठा संघर्ष करून इथंपर्यंत पोहचला आहे. आम्हाला एक चांगला संघ तयार करायचा आहे. टी20 मालिका झाली असून आता एकदिवसीय आणि कसोटीवर आमचे लक्ष आहे. पंत ठरला फिनिशर, धोनीसारखा षटकार मारून जिंकला सामना

भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. दोघांनी महत्त्वपूर्ण अशी शतकी भागिदारी केली. विराट कोहलीने 59 धावा केल्या. 18 व्या षटकात कोहली बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने मनीष पांडेसोबत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पंतने 37 चेंडूत त्याचं आंतरराष्ट्रीय टी 20 मधील पहिलं अर्धशतक साजरं केलं. भारताने सलग दुसऱ्यांदा विंडीजविरुद्ध टी 20 मालिका 3-0 ने जिंकली. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेविरुद्धही 3-0 ने विजय मिळवला आहे.

VIDEO : धोनी म्हणतो, मै पल दो पल का शायर... माझ्यापेक्षा चांगलं खेळणारा कोणीतरी येईल

========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 11:20 AM IST

ताज्या बातम्या