IND vs WI : विंडीजवर दणदणीत विजयानंतरही विराटला टेन्शन!

विराट कोहलीने कसोटीत भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्यात धोनीची बरोबरी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 12:57 PM IST

IND vs WI : विंडीजवर दणदणीत विजयानंतरही विराटला टेन्शन!

अँटिगुआ, 26 ऑगस्ट : भारतानं विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 318 धावांनी विजय मिळवला. भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी सुरुवात केली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. बुमराहनं अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं 31 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं परदेशात आतापर्यंत 12 कसोटी जिंकल्या आहेत. त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 11 कसोटीत विजय मिळवला होता. तर धोनी कर्णधार असताना भारतानं परदेशात फक्त 6 कसोटी जिंकल्या होत्या. याशिवाय विराटनं भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं आहे. त्यानं कसोटीत 27 विजय मिळवून देत धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारतानं जरी पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला असला तरी विराटचं टेन्शन कमी झालेलं नाही. ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्याला टी20 मध्ये एक सामना वगळता इतर सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. आतापर्यंत अनेकवेळा पंतनं त्याला मिळालेली संधी गमावली आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, टी20 मालिकेत आणि दुसऱ्या सामन्यातही पंत चुकीच्या फटक्यामुळं बाद झाला. त्यानं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली.

कसोटीत चौथ्या दिवशी भारताचा डाव 3 बाद 185 धावांवरून पुढे सुरू झाला. त्यात दोन धावांची भर घालून कोहली बाद झाला. त्यानंतर रहाणे आणि विहारी यांनी महत्त्वपूर्ण भागिदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर पंत मैदानात उतरला. मात्र, त्याला फक्त 7 धावा काढता आल्या. त्यामुळं पंतची फलंदाजी हा सध्या चिंतेचा विषय आहे.

दरम्यान, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. चहापानापर्यंत भारताने 98 धावांत तीन गडी गमावले होते. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी शतकी भागिदारी केली. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरले. तर केएल राहुलसुद्धा लवकर बाद झाला. भारताची अवस्था 3 बाद 81 अशी झाली होती. विंडीजच्या रोस्टन चेजनं 42 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर रहाणे आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सांभाळला.

Loading...

सावधान! तुम्ही भेसळयुक्त स्कॉच पिताय? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...