विराटला मिळाले 'सिंहासन'; कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला टाकले मागे!

विराटला मिळाले 'सिंहासन'; कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला टाकले मागे!

जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहली याने पुन्हा एकदा क्रमांक एकचे सिंहासन मिळवले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहली याने पुन्हा एकदा क्रमांक एकचे सिंहासन मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking)विराट कोहली (Virat Kohli)ने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)याला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. ताज्या अपडेट नुसार पहिल्या 10 फलंदाजांमध्ये विराट वगळता दोन भारतीय फलंदाजाला स्थान मिळवता आले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार विराटने 928 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. तर स्मिथ 923 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध झालेल्या कोलकाता येथील पहिल्या डे-नाईट सामन्यात शतक झळकावले होते. या कामगिरीचा त्याला फायदा झाला. या उलट पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत दोन्ही कसोटीत स्मिथला चांगली कामगिरी करता आली नाही. दोन्ही डावात त्याने 50 धावा देखील केल्या नाहीत. ब्रिसबेन कसोटीत 4 तर अॅडलेड कसोटीत त्याने 36 धावा केल्या. या खराब कामगिरीचा फटका स्मिथला बसला.

रोहितला फटका

बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात खराब कामगिरी केल्याचा फाटका रोहित शर्मा (Rohit Sharma)ला बसला. ताज्या आकडेवारीनुसार रोहित पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. विराट कोहली वगळता भारताचा चेतेश्वर पुजारा चौथ्या तर अजिंक्य रहाणे सहाव्या स्थानावर आहेत.

डेव्हिड वॉर्नरची धमाकेदार कामगिरी

कसोटी क्रमवारीत यावेळी सर्वात दमदार कामगिरी कोणाची झाली असेल तर ती ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर (David Warner)ची होय. पाकिस्तानविरुद्ध नाबाद त्रिशतक झळकावणाऱ्या वॉर्नरने क्रमवारीत 12 स्थानांची झेप घेतली आहे. आता तो क्रमवारीत 5व्या स्थानावर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात द्विशतक करणारा इंग्लंडा कर्णधार जो रुट सातव्या स्थानावर आहे.

मोहम्मद शमी टॉप 10 मध्ये

आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या मोहम्मद शमीने पहिल्या 10 मध्ये जागा मिळवली आहे. टॉप टेनमध्ये भारताचे तीन गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह चौथ्या आणि आर.अश्विन 9व्या स्थानावर आहे.

First published: December 4, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading