मुंबई, 3 जून: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली
(Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या जोडप्याला त्यांचे खासगी आयुष्य सार्वजनिक करायला आवडत नाही. या दोघांना जानेवारी महिन्यात मुलगी झाली. त्यांच्या मुलीचं नाव वामिका
(Vamika) आहे. वामिकाच्या जन्मानंतर काही दिवसांनी विराट आणि अनुष्कानं पापारझ्झींना
(Paparazzi) पत्र लिहून कृपया आमच्या नवजात बाळाचे
(मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती केली होती. त्यानंतरही अनेकदा वामिकाचे फोटो काढण्यात आले आहेत. त्याबद्दल विराट आणि अनुष्कानं नाराजी देखील व्यक्त केली आहे.
टीम इंडिया बुधवारी रात्री इंग्लंडला रवाना झाली. विराटसोबत अनुष्का आणि वामिका देखील होत्या. अनुष्का बसमधून उतरताच फोटोग्राफर्सनी वामिकाचे फोटो काढणे सुरु केले. यावेळी वामिका अनुष्काच्या कुशीत झोपली होती. वामिकाचा चेहरा कुणाला दिसू नये म्हणून अनुष्कानं तिचं तोंड पूर्ण झाकले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होतोच फॅन्स नाराज झाले.
एका युझरने लिहिले की, 'बाळाला एवढे झाकून घेतल्याने तिचा श्वास कोंडला नाही ना ते बघा. ही गोष्ट फारच लाजीरवाणी आहे. त्यांच्या खासगी आयुष्याचा
(Personal Life) सन्मान करा.' 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही विराट- अनुष्काच्या मुलीचे फोटो सोशल मिडीयावर का पोस्ट करीत आहात? आई-वडिलांच्या विचाराचा आदर करा. त्यांनी मुलीचे फोटो काढण्यास मनाई केली आहे. त्यानंतरही, वामिकाचे फोटो तुम्ही ती सोशल मिडीयावर का पोस्ट करीत आहात?' असा प्रश्न दुसऱ्या युझरनं विचारला आहे.

'कॅमेऱ्याचा फ्लॅश लाईट किती त्रासदायक आहेत. बाळ झोपले आहे हे तरी किमान लक्षात घ्या.' असे आवाहन अन्य एका युझरनं केलं आहे.
इंग्लंडला जाण्यापूर्वी विमानतळावर दिसले टीम इंडियाचे दिग्गज, पाहा PHOTOS
'वामिकाला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे." असे विराटने काही दिवसांपूर्वी एका फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.