विराट कोहलीनं स्टम्पवर काढला राग, VIDEO झाला व्हायरल

विराट कोहलीनं स्टम्पवर काढला राग, VIDEO झाला व्हायरल

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानावर नेहमीच आक्रमक दिसतो. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यानं स्टम्पवर राग काढल्याचं दिसलं.

  • Share this:

मोहाली, 19 सप्टेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या टी20 सामन्यात आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. भारताने या विजयासह 3 टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. त्यानंतर विजयासाठी दिलेल 150 धावांच आव्हान भारतानं 19 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार कोहलीनं 52 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीनं 72 धावा केल्या. तर शिखर धवनने 40 धावांची खेळी केली. या सामन्यात विराटचा आक्रमक स्वभाव बघायला मिळाला. त्यानं फिल्डिंग करताना स्टम्पवर काढलेल्या रागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ खेळत असताना दहाव्या षटकात डी कॉक फलंदाजी करत होता. त्यानं एक फटका मारून दोन धावा घेतल्यानंतर तिसरी धाव घेतली. यावेळी विराट कोहली स्टम्पजवळ होता आणि श्रेयस अय्यरने चेंडू अडवला आणि थ्रो केला. मात्र, चेंडू स्टम्पपासून दूर गेला होता. यावेळी रागाने कोहलीनं चेंडू पकडल्यानंतर स्टम्पच उखडली.

भारताने अखेरच्या चार षटकांत टिच्चून मारा केला. या 4 षटकांत भारताने फक्त 24 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज दीपक चाहरनं 22 धावा देत 2 गडी बाद केले.

विराट कोहलीनं नाबाद 72 धावांची खेळी करून एकहाती विजय मिळवून दिला. यासह विराट हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा फक्त 7 धावांनी मागे आहे. त्यामुळे यापुढे दोघांमध्ये स्पर्धा असेल.

विराट कोहलीच्या 66 डावात 2 हजार 441 धावा झाल्या आहेत. तर रोहित शर्माने 89 डावात 2 हजार 434 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मानंतर या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे. त्याच्या 75 डावात 2 हजार 283 धावा झाल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक 104 डावात 2 हजार 263 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीनं फक्त 71 सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर रोहित शर्माला मात्र 26 सामने जास्त खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात त्यानं 2 षटकारांसह 12 धावा केल्या. पुढचा सामना 22 सप्टेंबरला बेंगळुरूत होणार आहे.

VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading