Home /News /sport /

6 महिन्यांची झाली Vamika, अनुष्कानं शेअर केला विराट सोबतचा गोड Photo

6 महिन्यांची झाली Vamika, अनुष्कानं शेअर केला विराट सोबतचा गोड Photo

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिका (Vamika) ची झलक पाहण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात.

    मुंबई, 12 जुलै : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिका (Vamika) ची झलक पाहण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. या जोडप्यानं वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. वामिका रविवारी (11 जुलै) सहा महिन्यांची झाली. त्या निमित्तानं रात्री वामिकाचे दोन फोटो शेअर केले आहेत. विराट आणि अनुष्कासोबतचे तिचे हे वेगवेगळे फोटो आहेत. नेहमीप्रमाणे वामिकाचा चेहरा दिसणार नाही, याची काळजी अनुष्कानं घेतली आहे. हो फोटो अनुष्कानं शेअर करताच जोरदार व्हायरल झाले आहेत. इन्सटाग्रामवर अर्ध्या तासांमध्ये 9 लाखांहून अधिक जणांनी हे फोटो लाईक केले आहेत. वामिकाचा चेहरा का दाखवत नाही? वामिका या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? मी तिचा फोटो पाहू शकतो का? असा प्रश्न विराट कोहलीला एका इन्स्टा सेशनमध्ये फॅननं विचारला होता.  या प्रश्नाचं उत्तर देताना विराटनं सर्वप्रथम वामिका या नावाचा अर्थ समाजवून सांगितला. वामिका हे दूर्गा देवीचं नाव असल्याचं विराटने सांगितलं. त्यानंतर तिच्या फोटो बद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिले. " तिला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे." असे विराटने सांगितले. 'तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलता, पण त्याने अजून IPL...' विराटच्या कॅप्टनसीवर रैनाचं मोठं वक्तव्य वामिकाचा जन्म 11 जानेवारी रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही दिवसांनी विराट आणि अनुष्कानं पापारझ्झींना (Paparazzi) पत्र लिहून कृपया आमच्या नवजात बाळाचे (मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Social media, Viral photo, Virat kohli and anushka sharma

    पुढील बातम्या