धोनी-गांगुलीनं केलेली चूक करतोय विराट, भारताला बसणार फटका?

भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर असून 22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 03:33 PM IST

धोनी-गांगुलीनं केलेली चूक करतोय विराट, भारताला बसणार फटका?

भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे. भारतानं टी20 पाठोपाठ एकदिवसीय मालिकासुद्धा जिंकली आहे. त्यानंतर कसोटी मालिका सुरू असून यामध्ये विराटनं रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना संधी दिली आहे. दोघेही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये आहेत मात्र कसोटीमध्ये त्यांना लय गवसलेली नाही.

केएल राहुल तीनही प्रकारच्या क्रिकेट संघात आहे. त्यानं गेल्या काही वर्षांत सलग चांगली कामगिरी नोंदवून संघात स्थान पटकावलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी जबरदस्त आहे. कसोटीत मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तरीसुद्धा विराटने केएल राहुलला संधी दिली आहे. त्यानं 31 कसोटीत 1 हजार 736 धावा केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही.

भारताचा सलामीवीर शिखर धवन स्टार फलंदाजांपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवन जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतो. मात्र कसोटीत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. धवनने 21 कसोटीत 1 हजार 419 धावा केल्या आहेत. सलामीला खेळणाऱ्या फलंदाजासाठी ही आकडेवारी दिलासा देणारी नसली तरीही शिखर धवनला वेळोवेळी विराटनं संधी दिली आहे.भारताचा सलामीवीर शिखर धवन स्टार फलंदाजांपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवन जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतो. मात्र कसोटीत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. धवनने 21 कसोटीत 1 हजार 419 धावा केल्या आहेत. सलामीला खेळणाऱ्या फलंदाजासाठी ही आकडेवारी दिलासा देणारी नसली तरीही शिखर धवनला वेळोवेळी विराटनं संधी दिली आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवन स्टार फलंदाजांपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवन जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतो. मात्र कसोटीत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. धवनने 21 कसोटीत 1 हजार 419 धावा केल्या आहेत. सलामीला खेळणाऱ्या फलंदाजासाठी ही आकडेवारी दिलासा देणारी नसली तरीही शिखर धवनला वेळोवेळी विराटनं संधी दिली आहे.

हिटमॅन रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अनेक विक्रम त्यानं नावावर केले आहेत. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट गाजवणाऱ्या रोहित शर्माला कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटीत संधी मिळाली मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. आता सराव सामन्यात अर्धशतक करून त्यानं दावा केला आहे.

विराटनेच नव्हे तर धोनी, गांगुली या कर्णधारांनीसुद्धा खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुन्हा पुन्हा संधी दिली होती. धोनीने सुरेश रैनाला कसोटीत तर आर अश्विनला एकदिवसीय संघात स्थान दिलं होतं.

Loading...

भारतीय क्रिेकेटचा दादा अशी ओळख असलेल्या गांगुलीनं सध्या फलंदाजी प्रशिक्षक असेलेल्या संजय बांगर यांना अनेकदा संधी दिली. याशिवाय धोनीच्या आधी पार्थिव पटेल यष्टीरक्षण करत होता. त्यालाही गांगुलीने दिलेल्या संधीचा फायदा घेता आला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 18, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...