Home /News /sport /

'या' स्टंटमॅन अंपायरची जगभर चर्चा, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

'या' स्टंटमॅन अंपायरची जगभर चर्चा, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

अंपायरच्या एका निर्णयामुळे ( umpire decisions ) क्रिकेट सामन्याचा निर्णय बदलण्यास सुद्धा मदत झाली आहे. अशावेळी सोशल मीडियावर खराब अंपारिंगवर जोरदार चर्चा होत असते.

मुंबई, 06 डिसेंबर: क्रिकेट सामन्यात ( cricket matches ) अंपायर ( Umpires ) महत्त्वाची भूमिका बजावत असतात. बॉलरने एखादा बॉल टाकून अपील केल्यानंतर अंपायर काय निर्णय देतो, याकडेही सर्वांच्या नजरा असतात. अनेकदा खराब अंपायरिंगचा फटका अनेक खेळाडू ( players ) आणि संघांना ( teams ) बसला आहे. अंपायरच्या एका निर्णयामुळे ( umpire decisions ) क्रिकेट सामन्याचा निर्णय बदलण्यास सुद्धा मदत झाली आहे. अशावेळी सोशल मीडियावर खराब अंपारिंगवर जोरदार चर्चा होत असते. मात्र, आता सोशल मीडियावर ( social media ) एका अंपायरची चर्चा त्याच्या निर्णय देण्याच्या पद्धतीवरून सुरू आहे. नवभारत टाइम्स ने याबाबत वृत्त दिले आहे. क्रिकेटमध्ये अंपायरिंग हे अत्यंत कठीण आणि गंभीर काम मानले जाते. कारण अंपायरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे संघ जिंकू किंवा हरू शकतो. त्यासाठी प्रत्येक निर्णय देताना अंपायरने काळजी घ्यावी लागते. बॉलर-फिल्डर्स यांनी अपील केल्यानंतर त्यावर योग्य निर्णय देणे अंपायरची जबाबदारीच असते. अंपायरने एखादा चुकीचा निर्णय दिल्यानंतर त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जाते. त्याच्यावर टीकाही केली जाते. पण काही अंपायर हे त्यांच्या निर्णय देण्याच्या मजेदार शैलीने जगभर चर्चेचा विषय ठरतात. हेही वाचा-  महिलेनं कुत्र्याला बनवलं लेखक, प्राण्यांच्या भाषेतून केला इंग्रजीत अनुवाद आज तुम्हाला अशाच एका अंपायरची माहिती देत आहोत, ज्याच्या निर्णय देण्याच्या पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा अंपायर महाराष्ट्रातील स्थानिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत त्यांच्या निर्णय देण्याच्या पद्धतीने लोकांचे मनोरंजन करताना दिसला. पुरंदर प्रीमिअर लीगमधील एका सामन्यादरम्यान जेव्हा बॉलरने वाइड बॉल टाकला, तेव्हा अंपायरने वाइडचा इशारा हा दोन्ही हातांनी देण्याऐवजी पायाच्या साहाय्याने दिला. हा अंपायर कॅमेरा जवळ गेला, आणि डोक्यावर उभा राहून त्याने पायाने वाइडचा इशारा दिला. अर्थात, मैदानावर अंपायरने अशा मजेदार शैलीने निर्णय देऊन जगाचे लक्ष वेधून घेतलेली ही पहिलीच घटना नाही. न्यूझीलंडचा बिली बॉडेन त्याच्या स्टाईलसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध होता. मात्र, आता या अंपायरची सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील या अंपायरचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. कोणी या अंपायरला टायगर श्रॉफसारखा स्टंटमॅन म्हणत आहेत, तर कोणी त्याला बाबा रामदेव यांचा शिष्य म्हणत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला बॅट्समन देखील या अंपायरने निर्णय देताना केलेली कृती पाहून चकित झाला आहे. हेही वाचा-  7 वर्षांपूर्वी ज्या सिंहिणीचा जीव वाचवला ती अचानक समोर आली अन्..; VIDEO पाहून व्हाल हैराण
 क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू हे त्यांनी केलेल्या विक्रमांमुळे लक्षात राहत असतात. मात्र, काही अंपायर त्यांच्या निर्णय देण्याच्या पद्धतीमुळे लक्षात राहतात. यामध्ये प्रामुख्याने न्यूझीलंडच्या बिली बॉडेन या अंपायरचे नाव घेता येईल. बॅट्समनने मारलेला सिक्स देण्याची या अंपायरची पद्धत क्रिकेटप्रेमींना माहिती नसेल तरच नवल!
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Viral news

पुढील बातम्या