Home /News /sport /

मुरलीधरनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज होताच भारतात वाद, पाहा काय आहे कारण

मुरलीधरनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज होताच भारतात वाद, पाहा काय आहे कारण

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू मुथैय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan)याच्या आयुष्यावरचा बायोपिक लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. पण या बायोपिकचं पोस्टर रिलीज होताच नवा वाद निर्माण झाला आहे.

    चेन्नई, 15 ऑक्टोबर : श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू मुथैय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan)याच्या आयुष्यावरचा बायोपिक लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. पण या बायोपिकचं पोस्टर रिलीज होताच नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात मुरलीधरनची भूमिका करणाऱ्या विजय सेतुपती (Vijay Setupathi)यांना ट्रोल करण्यात येत आहे. विजय सेतुपती यांना श्रीलंकेच्या झेंड्यासोबत दिसण्याला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. श्रीलंकेमध्ये तामिळ जनतेवर अत्याचार श्रीलंकेमध्ये तामिळ जनता अल्पसंख्याक आहे. तिकडे अनेक वर्ष तामिळ जनतेवर सिंहली जनतेकडून अत्याचार झाला आहे. श्रीलंकेमध्ये याच कारणामुळे 1983 ते 2009 या कालावधीत गृहयुद्ध झालं होतं. यात मोठ्या प्रमाणात तामिळ जनतेचा मृत्यू झाला होता. यानंतर मोठ्या प्रमाणावर तामिळ जनता विस्थापित म्हणून भारतात परत आली. श्रीलंकेत तामिळ जनतेवर एवढे अत्याचार झाले असताना तिथल्या क्रिकेटपटूच्या बायोपिकमध्ये विजय सेतुपती कसं काम करु शकतात? असा प्रश्न विचारला जात आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 तामिळ या चॅनलवर मुरलीधरन आणि विजय सेतुपती यांच्या उपस्थितीमध्ये 13 ऑक्टोबरला चेन्नई आणि हैदराबादच्या मॅचवेळी रिलीज करण्यात आलं. 800 असं मुरलीधरनच्या या बायोपिकचं नाव आहे. मुरलीधरनने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट घेतल्यामुळे या चित्रपटाचं नावही तेच ठेवण्यात आलं. या चित्रपटासाठी विजय सेतुपती यांची निवड एकमताने झाल्याचं मुरलीधरनने सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या