मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Vijay Hazare Trophy : 6 जण झाले शून्यावर आऊट, 50 ओव्हर्सची मॅच संपली झटपट

Vijay Hazare Trophy : 6 जण झाले शून्यावर आऊट, 50 ओव्हर्सची मॅच संपली झटपट

विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) ही बीसीसीआयची 50 ओव्हर्सची स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेतील रविवारी झालेल्या मॅचमध्ये एकाच टीममधील 6 जण शून्यावर आऊट झाल्यानं मॅचचा निकाल झटपट लागला.

मुंबई, 12 डिसेंबर : विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) ही बीसीसीआयची 50 ओव्हर्सची स्पर्धा सध्या सुरू आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa ODI Series) यांच्यातील वन-डे सीरिजसाठी टीम निवडताना या स्पर्धेतील कामगिरीचा विचार केला जाणार आहे. त्यामुळेच शिखर धवन ते ऋतुराज गायकवाड आणि युजवेंद्र चहल ते व्यंकटेश अय्यर हे सर्व खेळाडू या स्पर्धेत सर्वस्व पणाला लावून खेळत आहे. या स्पर्धेतील रविवारी झालेली एक मॅच अगदीच झटपट संपली.

त्रिपूरा विरुद्ध नागालँड (Tripura vs Nagaland) या दोन राज्यांच्या क्रिकेट टीममधील मॅच झटपट संपली.  या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींगला आलेली नागालँडची टीम त्रिपुराच्या बॉलर्सनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे फक्त 14 ओव्हर्समध्ये 48 रनवर ऑल आऊट झाली. नागालँडचे 6 बॅटर्स शून्यावर आऊट झाले. उर्वरित 5 पैकी 4 जणांना दोन अंकी रन करता आले नाहीत. फक्त एका बॅटरनं दोन अंकी आकाडा गाठत 16 रन काढले.

त्रिपूराकडून मुनिशंकर सिंह सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 6 ओव्हर्समध्ये 19 रन देत 5 विकेट्स घेलल्या.  अजॉय सरकार आणि राणा दत्ता यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला साथ दिली. मुनीशंकर सिंहनं लिस्ट A क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका मॅचमध्ये 5 विकेट्सची कामगिरी केली.

विराट कोहली कॅप्टनपदाहून दूर होताच टीम इंडियातील दिग्गजाला आले 'अच्छे दिन'

त्रिपूराला निर्धारित 50 ओव्हर्समध्ये एक पेक्षा कमी रननेटनं 49 रनचं आव्हान होतं. त्रिपुराच्या ओपनर्सनी फक्त 10.1 ओव्हर्समध्ये म्हणजे 61 बॉलमध्ये हे टार्गेट पूर्ण केले. त्रिपूराने नागालँडचा 10 विकेट्स आणि 239 बॉल राखून विजय मिळवला. त्रिपूराचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket