Home /News /sport /

धोनीच्या शिष्याचं सलग तिसऱ्या मॅचमध्ये शतक, टीम इंडियातील धवनची जागा धोक्यात

धोनीच्या शिष्याचं सलग तिसऱ्या मॅचमध्ये शतक, टीम इंडियातील धवनची जागा धोक्यात

महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) शिष्य ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत सग तिसऱ्या मॅचमध्ये शतक झळकावले आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : आयपीएल स्पर्धेतील (IPL) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कडून खेळणारा धोनीचा (MS Dhoni) शिष्य ऋतुराज गायकवाड  (Ruturaj Gaikwad) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी  (Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत सग तिसऱ्या मॅचमध्ये शतक झळकावले आहे. महाराष्ट्राचा कॅप्टन असलेल्या ऋतुराजने शनिवारी केरळविरुद्ध 110 (Maharashtra vs Kerala) बॉलमध्ये शतक पूर्ण केले. ऋतुराजने गुरुवारी छत्तीसगड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये  143 बॉलमध्ये नाबाद 154 रनची खेळी केली. या खेळीच्या दरम्यान त्याने 14 फोर आणि 5 सिक्स लगावले. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ही मॅच 8 विकेट्सनं दणदणीत जिंकली.  ऋतुराजने त्यापूर्वी  मध्य प्रदेश विरुद्ध 112 बॉलमध्ये 136 रनची खेळी केली होती. ऋतुराज कॅप्टन म्हणूनही या स्पर्धेत यशस्वी ठरत आहे.महाराष्ट्र क्रिकेट टीमने  त्याच्या कॅप्टनसीमध्ये सलग दोन मॅच जिंकत स्पर्धेची सुरूवात दमदार केली आहे. ऋतुराज गायकवाडसाठी 2021 हे वर्ष यशस्वी ठरले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त 636 रन करत ऑरेंज कॅप पटकावली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 5 मॅचमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 259 रन केले. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग 2 शतक झळकावत त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. या जबरदस्त फॉर्ममुळे ऋतुराजने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन-डे टीमसाठी दावेदारी सादर केली आहे. ऋतुराजची मुख्य स्पर्धा टीम इंडियाचा अनुभवी ओपनर शिखर धवनशी  (Shikhar Dhawan) आहे.  धवन विजय हजारे स्पर्धेत दिल्लीकडून खेळतोय. त्याची या स्पर्धेतील सुरूवात निराशाजनक झाली आहे. . झारखंड विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये तो 3 बॉल खेळून शून्यावर आऊट झाला. तर हैदराबाद विरुद्ध त्याने फक्त 12 रन काढले. टीम इंडियाच्या नव्या कॅप्टनची स्टोरी आहे खास, कुटुंबाचा त्याग वाचून तुम्ही कराल सलाम! 36 वर्षांच्या धवनची टी20 वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली नव्हती. तसंच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या 3 मॅचच्या टी20 सीरिजमध्येही त्याला संधी मिळाली नाही. त्याचवेळी, ऋतुराजला न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिदमध्ये संधी देण्यात आली होती. सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या  ऋतुराजमुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी धवनच्या जागेवर निवड होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Maharashtra, South africa, Team india

    पुढील बातम्या