VIDEO : पाकचा कर्णधार सरफराजची 'गंदी बात' व्हायरल

VIDEO : पाकचा कर्णधार सरफराजची 'गंदी बात' व्हायरल

सरफराजने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर अपशब्दांत केलेली टीका स्टम्पच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

  • Share this:

डर्बन, 23 जानेवारी : पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद वर्णभेदाच्या टीप्पणीमुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या वनडे मालिकेत पाकला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यामुळे आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सरफराज अहमद वादात सापडला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एंडिल फिलक्वायोवर वर्णभेदी टीका केल्याचा आरोप सरफराजवर झाला आहे. सरफराजने फिलक्वायोला वर्ण आणि आईबाबत अपशब्द वापरले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्णभेदी टीका केल्याप्रकरणी सरफराज अहमद दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यामध्ये त्याच्यावर 4 कसोटी किंवा 8 वनडे सामने खेळण्यावर बंदी घालण्यात येऊ शकते. दक्षिण आफ्रिकेच्या फिलक्वायोने 37 व्या षटकात चोरटी धाव घेतली. त्यावेळी सरफराजने त्याच्यावर अपशब्दांत केलेली टीका स्टम्पच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

सरफराजच्या या वर्णभेदी टिप्पणीविरोधात आयसीसीकडे तक्रार केली जाऊ शकते. जर सरफराज दोषी आढळला तर त्याच्यावर 4 कसोटी किंवा 8 वनडे सामने खेळण्यावर बंदीची कारवाई होऊ शकते.

First published: January 23, 2019, 9:27 AM IST

ताज्या बातम्या