Video- जेव्हा मुलीच्या तालावर नाचतो एमएस धोनी

ज्यापद्धतीने झिवा डान्स करते तिची नक्कल करत धोनीही डान्स करतो. साक्षीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2018 07:24 PM IST

Video- जेव्हा मुलीच्या तालावर नाचतो एमएस धोनी

रांची, ०४ डिसेंबर २०१८- एकीकडे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे एमएस धोनी घरच्यांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. धोनी त्याची मुलगी झिवासोबत नेहमीच मजा मस्ती करत असतो. मजा- मस्तीचे काही व्हिडिओ तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर करतो. धोनी आणि त्यची पत्नी साक्षी अनेकदा झिवाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यामुळे झिवाही सोशल मीडियावर फार प्रसिद्ध असते. तिचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अवघ्या काही मिनिटांत व्हायरल होतो. रविवारी धोनीने इन्स्टाग्रामवर झीवा आणि त्याचा नाचतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.


या व्हिडिओमध्ये झिवा तिच्या बाबांना डान्स शिकवताना दिसत आहे. ज्यापद्धतीने झिवा डान्स करते तिची नक्कल करत धोनीही डान्स करतो. साक्षीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. धोनीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ४ लाखांहून जास्त लाईक्स आले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.Loading...


 

View this post on Instagram
 

Even better when we are dancing @zivasinghdhoni006


A post shared by M S Dhoni (@mahi7781) on


या व्हिडिओआधी धोनीने झीवासोबतचा अजून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये झिवा त्याच्यासोबत भोजपूरी आणि तमिळ भाषेत बोलताना दिसते. त्याआधी धोनी झीवासाठी ससाही झाला होता. या व्हिडिओला कॅप्शन देताना धोनीने लिहिलं होतं की, ‘झीवाचा ससा’.
 

View this post on Instagram
 

Greetings in two language


A post shared by M S Dhoni (@mahi7781) on


धोनी पुढच्या वर्षी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत तो खेळणार आहे. १२ जानेवारीला सिडनीमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात येणार आहे. धोनीसाठी २०१८ हे वर्ष अत्यंत वाईट होतं.


२० एकदिवसीय सामन्यात २५ च्या सरासरीने त्याने फक्त २७५ धावा केल्या. संपूर्ण वर्षात त्याने एकदाही अर्धशतकी खेळी खेळली नाही. त्यामुळे किमान पुढच्या वर्षीतरी धोनीचा आधीचा फॉर्म परत येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...