मुंबई, 18 जुलै: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा त्याच्या हटके ट्विट्ससाठी प्रसिद्ध आहे. ताज्या घडामोडी, मॅचचा निकाल किंवा क्रिकेटपटूंचे वाढदिवस या निमित्तानं सेहवाग त्याच्या खास शैलीमध्ये ट्विट करत असतो. रोजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात सेहवागचे ट्विट हे त्याच्या फॅन्सचं मनोरंजन करतात. त्यामुळे त्याचे ट्विट्स काही वेळातच व्हायरल (Viral) होतात.
सेहवागनं ऑस्ट्रेलियाचे महान फास्ट बॉलर डेनिस लिली (Dennis Lillee) यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. लिली आज (18 जुलै) 72 वर्षांचे झाले आहेत. लिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना त्यांचा वेगळाच दरारा होता. सेहवागनं त्यामुळे त्यांना खास 'गुंडा' या हिंदी सिमेमाच्या स्टाईलनं शुभेच्छा दिल्या आहेत.
गुंडामधील प्रसिद्ध डायलॉगचं रुपांतर सेहवागनं त्याच्या स्टाईलमध्ये करत लिली यांना शुभेच्छा दिल्या आहेत.'नाम है लिली, करता हूं बॅट्समन की पँट गिली. डोन्ट बी सिली. हॅप्पी बर्थडे सर लिली' या शब्दात सेहवागने लिली यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Gunda Rocks . Naam hai Lillee, kar deta hoon Batsman ki Pant Gilee. Don’t be Silly. Happy Birthday Sir Lillee https://t.co/cAgMMYZuqa
— Virender Sehwag (@virendersehwag) July 18, 2021
टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला श्रीलंकेविरुद्ध द्विशतक झळकावण्याची संधी, 5 महिन्यांपासून आहे फॉर्मात
लिली यांची कारकिर्द
ऑस्ट्रेलियाच्या 'ऑल टाईम ग्रेट' बॉलरमध्ये लिली यांचा समावेश होतो. ते 1971 ते 1984 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या कालावधीमध्ये त्यांनी 70 टेस्टमध्ये 355 तर 63 वन-डेमध्ये 155 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोर त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 882 आणि A श्रेणीच्या क्रिकेटमध्ये 165 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. एका टेस्टमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी त्यांनी 7 वेळा तर एका इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी 23 वेळा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Viral post, Virender sehwag