'रणजी ट्राॅफी'त 'विदर्भ एक्स्प्रेस'सुसाट, रजनीश गुरबानीची हॅटट्रिक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2017 10:19 PM IST

'रणजी ट्राॅफी'त 'विदर्भ एक्स्प्रेस'सुसाट, रजनीश गुरबानीची हॅटट्रिक

30 डिसेंबर : इंदुर इथं रणजी ट्राॅफीत विदर्भाचा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीने इतिहास रचलाय. रजनीशने दिल्लीच्या विरोधात हॅटट्रिक साधलीये. तब्बल ४५ वर्षांनंतर त्याने ही कामगिरी केलीये.

इंदुरमध्ये रणजी ट्राॅफीच्या 84 व्या हंगामात दिल्ली विरुद्ध विदर्भ सामना सुरू आहे. गुरबानीने दिल्लीच्या विकास मिश्रा, नवदीप सैनी आणि ध्रुव शौरेला बाद करत हॅटट्रिक साधली आहे.

रजनीश गुरबानीने 69 धावा देऊन सहा गडी बाद केले. रजनीशच्या पराक्रमामुळे दिल्लीचा संघ 295 धावांवर गारद झालाय.

विदर्भविराची चौथी हॅट्रटि्क

विदर्भाकडून खेळताना रजनीश गुरबानी हा तिसरा खेळाडू ठरलाय. याआधी प्रितम गंधेने दोनवेळा हॅटट्रिक साधली होती. त्याने राजस्थानविरुद्ध 1993-94 आणि 2008-09मध्ये ही कामगिरी केली. तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने विदर्भकडून खेळताना हॅट्रटि्क घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 10:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...