मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाला मिळाला हार्दिक पांड्याचा वारसदार, राहुल द्रविड घेणार मोठा निर्णय?

टीम इंडियाला मिळाला हार्दिक पांड्याचा वारसदार, राहुल द्रविड घेणार मोठा निर्णय?

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे फारशी बॉलिंग करत नाही. टी20 वर्ल्ड कपनंतर लगेच 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध 3 मॅचची टी20 सीरिज (India vs New Zealand) सुरू होत आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 नोव्हेंबर: आयपीएल 2021(IPL 2021) स्पर्धेतून पुढं आलेला केकेआरचा (KKR) ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यरचा (Venktesh Iyer) फॉर्म सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेतही (Syed Mushtaq Ali Trophy) कायम आहे. अय्यरच्या ऑल राऊंड कामगिरीमुळे मध्य प्रदेशनं रेल्वेचा (Madhya Pradesh vs Railway) 7 विकेट्सनं पराभव केला. अय्यरनं आयपीएल स्पर्धेत 4 अर्धशतकासह 370 रन काढले होते. तसंच 3 विकेट्स घेतल्या होत्या.

व्यंकटेश अय्यर आणि आवेश खान यांच्या बॉलिंगच्या जोरावर मध्य प्रदेशनं रेल्वेला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 97 रनवरच रोखलं. आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या आवेशनं 3 विकेट्स घेतल्या. तर अय्यरनं 3 ओव्हर्समध्ये 20 रनच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. रेल्वेकडून शुभम चौधरीनं सर्वात जास्त 24 रन काढले.

मध्य प्रदेशनं 98 रनचं लक्ष्य 13.5 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अय्यरनं 41 बॉलमध्ये नाबाद 50 रन काढले. या खेळीत त्यानं 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. यापूर्वी स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये अय्यरनं 1 विकेट घेतली होती. तसंच 23 बॉलमध्ये 37 रन करत टीमला 6 विकेट्सनं विजय मिळवून दिला होता.

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स बनला पेन्शनर्स क्लब, महेंद्रसिंह धोनी काय घेणार निर्णय?

न्यूझीलंडविरुद्ध मिळणार संधी?

26 वर्षांचा व्यंकटेश अय्यर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्याच आयपीएल स्पर्धेत त्यानं 128 च्या स्ट्राईक रेटनं 370 रन काढले होते. तसंच तो उपयुक्त बॉलरही आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे फारशी बॉलिंग करत नाही. त्यामुळे त्याचा पर्याय म्हणून अय्यरकडं पाहिलं जात आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर लगेच 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध 3 मॅचची टी20 सीरिज (India vs New Zealand) सुरू होत आहे. या सीरिजमध्ये पांड्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून त्याच्या जागी अय्यरला संधी मिळू शकते.

T20 World Cup: अफगाणिस्तान हरलं तर काय करणार... रविंद्र जडेजानं दिलं रोखठोक उत्तर! VIDEO

टीम इंडियाचे नवे हेड कोच राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही पहिली स्पर्धा आहे. द्रविड भविष्याचा विचार करुन नवी टीम घडवणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे तो या सीरिजपूर्वी अय्यरबाबत काय निर्णय घेतो याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published: