लग्नाच्या बंधनात अडकला भारतीय क्रिकेटपटू, पत्नीसोबत मंडपातच खेळला क्रिकेट

लग्नाच्या बंधनात अडकला भारतीय क्रिकेटपटू, पत्नीसोबत मंडपातच खेळला क्रिकेट

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतलेला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) लग्नाच्या बंधनात अडकला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतलेला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) लग्नाच्या बंधनात अडकला आहे. वरुण चक्रवर्तीने त्याची गर्लफ्रेंड नेहा खेडेकरसोबत लग्न केलं आहे. आयपीएलच्या या मोसमात कोलकाता (KKR) कडून खेळताना वरुण चक्रवर्तीने धमाकेदार कामगिरी केली होती. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे वरुणला लग्नासाठी वाट पाहावी लागली होती. लॉकडाऊनमुळे वरुण चेन्नईमध्ये तर नेहा मुंबईत अडकली होती. यानंतर वरुण आयपीएल खेळण्यासाठी युएईला गेला, त्यामुळे लग्न स्थगित करण्यात आलं होतं.

कोलकाता नाईट रायर्डसनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जोडप्याला शुभेच्छा देत व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये वरुण पत्नीसोबत मंडपात क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वरुण पत्नीला बॉलिंग करत आहे.

वरुणला आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी शाहरुख खानच्या टीमने मोठी रक्कम देऊन विकत घेतलं होतं. यानंतर वरुणनेही कोलकात्याला निराश केलं नाही. या मोसमात वरुणने 6.84 च्या इकोनॉमी रेटने 17 विकेट घेतल्या. आयपीएलमधल्या या कामगिरीमुळे वरुणची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाली होती.

दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती टीमबाहेर गेला आणि त्याच्याऐवजी नटराजन याला संधी मिळाली. नटराजन यानेही या मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमधून नटराजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर तो तिन्ही टी-20 मॅचमध्ये खेळला. या दौऱ्यातल्या 4 मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या.

Published by: Shreyas
First published: December 13, 2020, 3:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या