मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कोरोनाचा क्रिकेटला पुन्हा फटका, आणखी एक ODI रद्द

कोरोनाचा क्रिकेटला पुन्हा फटका, आणखी एक ODI रद्द

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील वन-डे मालिका (West Indies vs Pakistan ODI Series) कोरोनामुळे रद्द होण्याचं उदाहरण ताजं आहे. त्यानंतर आता आणखी एक आंतरराष्ट्रीय वन-डे कोरोनामुळे रद्द झाली आहे.

मुंबई, 25 डिसेंबर : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव अजूनही कायम आहे. क्रिकेट विश्वाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षात अनेक क्रिकेट स्पर्धा या व्हायरसमुळे रद्द झाल्या किंवा लांबणीवर पडल्या. नुकत्याच पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिजच्या टीममध्ये (West Indies) कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे वेस्ट इंडिज टीम वन-डे मालिका न खेळताच माघारी परतली.

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील वन-डे मालिका कोरोनामुळे रद्द होण्याचं उदाहरण ताजं आहे. त्यानंतर आता अमेरिका विरुद्ध आयर्लंड (USA vs Ireland) यांच्यातील पहिला वन-डे मॅच रद्द करण्यात आली आहे. या मॅचसाठी असलेल्या अंपायरच्या टीममधील एकाला कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील पहिली वन-डे रविवारी फ्लोरिडामध्ये होणार होती.

युएसए क्रिकेट असोसिएशननं याबाबतचं वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. ' युएसए क्रिकेट, क्रिकेट आयर्लंड आयसीसी यापुढेही एकत्र काम करणार आहे. त्याचप्रमाणे या सीरिजमधील उरलेल्या मॅच कोरोनामुळे प्रभावित होणार नाहीत, याची काळजी घेतील.

याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार अमेरिकरेच्या कँपमधील एका नेट बॉलरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. पण ती व्यक्ती अमेरिकन टीमचा सदस्य नाही. अमेरिका विरुद्ध आयर्लंड यांच्या वन-डे मालिकेतील उर्वरित 2 सामने नियोजित वेळापत्रकानुसार 28 आणि 30 डिसेंबर रोजी होतील.

IND vs SA: पहिल्या टेस्टपूर्वी द्रविड करणार विराटचा बचाव, टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Cricket news, USA