IPL 2020, 1st Qualifier: कोण जिंकणार फायनलचं तिकिट? आज मुंबई-दिल्ली आमनेसामने

IPL 2020: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पॉवरफूल संघ आणि सध्याच्या सीझनमध्ये शानदार प्रदर्शन करणारा दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ यांच्यामध्ये आज पहिल्या क्वालिफायरसाठी चुरस असणार आहे.

IPL 2020: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पॉवरफूल संघ आणि सध्याच्या सीझनमध्ये शानदार प्रदर्शन करणारा दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ यांच्यामध्ये आज पहिल्या क्वालिफायरसाठी चुरस असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 05 नोव्हेंबर: आयपीएल टी-20 (IPL  2020) क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पॉवरफूल संघ आणि सध्याच्या सीझनमध्ये शानदार प्रदर्शन करणारा दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ यांच्यामध्ये आज पहिल्या क्वालिफायरसाठी चुरस असणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल त्याला 10 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये थेट प्रवेश मिळेल, तर पराभूत झालेल्या संघाला दुसरा क्वालिफायर खेळून फायनलमध्ये पोहोचण्याची दुसरी संधी मिळेल. मुंबईचं पारडं जड साखळी सामन्यांमध्ये आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत चार वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा पराभव करणे सोपे नव्हते, परंतु मंगळवारी सनरायझर्स हैदराबादकडून 10 गडी राखून झालेल्या पराभवामुळे त्यांची लय बिघडली. दुसरीकडे, सलग चार सामने हरल्यानंतर दिल्लीने आपला पहिला विजय मिळवला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव करून दिल्लीने दुसरे स्थान पटकावले. या विजयामुळे त्यांचे मनोबल निश्चितच वाढले असेल. परंतु लीग टप्प्यात मुंबईने दोन्ही सामन्यांत दिल्लीचा पराभव केला आहे. (हे वाचा-दीर्घकाळापासून एकही सामना खेळला नाही,तरी वनडे क्रिकेटमध्ये कोहली-रोहितचा बोलबाला) आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत दिल्ली आणि मुंबई यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 14 सामने जिंकले आहेत तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. यावर्षी या दोन संघांत दोन सामने झाले आणि दोन्ही सामने रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीचा संघावर दबाव नक्कीच आहे. रोहित शर्मा परतल्यानंतर मुंबईचा संघ आणखी मजबूत मुंबई इंडियन्स संघासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma)पुनरागमन. रोहित हॅमस्ट्रिंगमुळे चार सामने खेळला नव्हता. हा स्टार सलामी फलंदाज मात्र सनरायझर्सविरूद्ध लवकर डगआउटमध्ये परतला. मुंबईच्या संघात आक्रमक फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत पण त्यांचे फलंदाज सनरायझर्सविरूद्ध खेळू शकले नाहीत. त्याच्या गोलंदाजांना विकेटही मिळू शकल्या नाहीत आणि महत्त्वाच्या सामन्याआधी कोणताही सामना हलक्यात घेऊ नये, हा त्यांच्यासाठी चांगला धडा होता. मुंबईच्या फलंदाजांची चांगली कामगिरी मुंबईच्या टॉप ऑर्डरने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. युवा खेळाडू ईशान किशन (428 धावा) हा त्यांचा प्रमुख फलंदाज म्हणून पुढे आला आहे. क्विंटन डीकॉक (443 धावा) आपला शानदार फॉर्म सुरू ठेवण्यास सज्ज आहे. यानंतर सूर्यकुमार यादव (410 धावा) याने आपली भूमिका चांगली पार पाडली आहे. हार्दिक पंड्या (241 धावा), कायरन पोलार्ड (259 धावा) आणि कृणाल पंड्या (95 धावा) यांनी आवश्यकतेनुसार आपलं कौशल्य दाखविलं. पोलार्डने सनरायझर्सविरूद्ध चार षटकारही ठोकले होते. (हे वाचा-टीममध्ये निवड होण्याकरता वडिलांकडे मागण्यात आली होती लाच, विराटचा गौप्यस्फोट) सनरायझर्सविरुद्ध मुंबईने आपले मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (23 विकेट) आणि ट्रेंट बोल्ट (20 विकेट) यांना आराम देण्यात आला होता. सुरुवातीच्या आणि डेथ ओव्हर्समध्ये या दोघांनी प्राणघातक गोलंदाजी केली आहे. दिल्लीविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी राहुल चहर आणि कृणाल यांना सनरायझर्सच्या डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहाकडून झालेली दमदार धुलाई विसरावी लागेल. दिल्लीला पृथ्वी शॉ आणि रिषभ पंतच्या फॉर्मची चिंता अजिंक्य रहाणेचं फॉर्ममध्ये पुनरागमन होणं दिल्लीसाठी चांगलं लक्षण आहे. त्याने आरसीबीविरुद्ध 60 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. शिखर धवन (525 धावा) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे पण त्याला इतर फलंदाजांच्या पाठिंब्याची गरज आहे. दिल्लीची सर्वांत मोठी चिंता म्हणजे पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांचे फॉर्म, ज्यांनी अजूनही अपेक्षा पूर्ण करणारी खेळी केली नाही आहे. शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टोइनिस यांनाही महत्त्वपूर्ण सामन्यात आपला फॉर्म दाखवावा लागणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर (421 धावा) याला सुद्धा सामन्याची धुरा आपल्या हाती घ्यावी लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: