धोनी-रैनासोबत खेळलेल्या दोन भारतीय क्रिकेटपटूंची निवृत्ती, BCCI ला पाठवला मेल

अंबाती रायुडु, युवराज सिंग यांच्यानंतर आणखी दोन भारतीय क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे.

  • Share this:

वर्ल्ड कपदरम्यानच भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर युवराज सिंग, मनप्रीत गोनी आणि वेणुगोपाल राव यांनी निवृत्ती घेतली. आता आणखी दोन क्रिकेटपटूंनी बीसीसीआयला ईमेल पाठवला आहे. त्यांनीही परदेशी टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी परवानगी मागितली आहे. यावर अद्याप बीसीसीआयनं कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

उत्तर प्रदेशच्या असलेल्या प्रशांत गुप्ता आणि इम्तियाज अहमद यांनी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही खेळाडू उत्तर प्रदेशकडून सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ यांच्यासोबत खेळले आहेत.

सध्या 31 वर्षांचा असलेल्या प्रशांत गुप्ताला भारताच्या संघात संधी मिळाली नाही. त्यानं 21 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असून त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांच्या जोरावर 879 धावा केल्या आहेत.  तर लिस्ट ए मध्ये 26 सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 688 धावा केल्या आहेत. टी20 त्यानं 37 सामन्यात 1 हजार 111 धावा केल्या असून यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.  तीनही प्रकारात शतक केलेल्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव आहे.

प्रशांत गुप्तासोबत 33 वर्षीय़ वेगवान गोलंदाज इम्तियाज अहमदनं निवृत्ती घेतली आहे. त्यानं 45 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 138 तर 20 लिस्ट ए सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय टी20 मध्ये 20 सामन्यात 17 विकेट घेतल्या होत्या. त्याला आयपीएलमध्ये चेन्नई आणि पुण्याकडून संधी मिळाली मात्र फारशी चमक दाखवता आली नव्हती.

आयपीएलमध्ये इम्तियाज अहमदला चेन्नईकडून संधी मिळाली मात्र फारशी चमक दाखवता आली नव्हती. दोन्ही खेळाडूंनी बीसीसीआयला ईमेल पाठवला आहे. त्यांना खेळण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले असून परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी परवानगीही मागितली आहे. दोघांनी एकाच वेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या