मिताली राजच्या वडिलांनी केलं असं काही की भारताला मिळाली सर्वोत्तम कर्णधार

मिताली राजच्या अशा पाच गोष्टी ज्या अनेकांना माहितीच नाहीत.

  • Share this:

मिताली राजला लहानपणी क्रिकेट हा खेळ अजिबात आवडायचा नाही. सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिलाही डान्सची आवड होती. मितालीचे वडील दोराई राजा हे भारतीय वायूसेनेत होते.

त्यांनी मितालीला क्रिकेट कोचिंग द्यायचं ठरवलं. मिताली लहानपणी फार आळशी होती. तिच्या या आळसाला दोराई राजा फार वैतागले होते. मिताली तिच्या मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळायला जायची. हळूहळू तिचा या खेळात रस निर्माण झाला.

मिताली राजने भरतनाट्यममध्ये विशारद पदवी मिळवली आहे. तिने ८ वर्ष भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं आहे. तिने भरतनाट्यमचे अनेक कार्यक्रमही केले.

मितालीला आजही क्रिकेट आणि डान्स या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवडतात. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, ती जर क्रिकेटर झाली नसती तर ती एखादी शासकीय अधिकारी असती.

मितालीला वाचनाचीही फार आवड आहे. तिला क्राइम, इतिहास, आत्मचरित्र आणि फिलॉसॉफी अशा विषयांवरील पुस्तकं वाचायला आवडतात. वर्ल्डकपच्यावेळी फलंदाजीला जाण्यापूर्वीही ती पुस्तक वाचताना दिसली होती.

मिताली राज ही ‘विसडन क्रिकेटर ऑफ द इअर’ पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 01:42 PM IST

ताज्या बातम्या