Home /News /sport /

U19 World Cup: टीम इंडियाचा धडाका, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलियाचाही केला पराभव

U19 World Cup: टीम इंडियाचा धडाका, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलियाचाही केला पराभव

वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) सुरू आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने जय्यत तयारी केली आहे.

    मुंबई, 12 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) सुरू आहे. या स्पर्धेच्या वॉर्म अप मॅचमध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय टीमनं पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा 108 रनने पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (India U19 vs Australia U19) 9 विकेट्सनं सहज पराभव केला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन यश धुल (Yash Dhull) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियानं कॅप्टन कूपर कनोली याने शतक झळकावले. कनोलीच्या 117 रनच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटींग करत 268 रन केले. टीम इंडियाकडून रवी कुमार सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 34 रन देत 4 विकेट्स घेतले. यशवर्धननं 3 विकेट्स घेत त्याला उत्तर साथ दिली. 269 रनचे टार्गेट भारतीय बॅटर्सनी आक्रमक खेळ करत अवघ्या एक विकेटच्या मोबदल्यात आणि 15 बॉल शिल्लक राखून पूर्ण केले. ओपनर अंगकृष रघुवंशी (27) हा एकमेव भारतीय बॅटर आऊट झाला. हरनूर सिंह 108 बॉलमध्ये 100 रन काढत रिटायर हर्ट झाला. सध्या फॉर्मात असलेल्या शेख रसीदने 74 बॉलमध्ये 72 रनची खेळी केली. कॅप्टन यश धुलनेही 47 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. टीम इंडियासाठी पुन्हा येणार FAB 4 एकत्र, द्रविड-लक्ष्मणनंतर सचिनसाठी BCCI ची फिल्डिंग टीम इंडियाने हा वर्ल्ड कप सर्वाधिक 4 वेळा जिंकला आहे. या स्पर्धेत भारतीय टीमचा दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा टीमसह ग्रुप B मध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाची पहिली लढत 15 तारखेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket, India vs Australia, Team india

    पुढील बातम्या