मुंबई, 29 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup) टीम इंडिया शनिवारी क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा (India vs Bangladesh) सामना करणार आहे. या मॅचच्या पूर्वी टीम इंडियात एक बदल झाला आहे. भारतीय टीममध्ये आराध्य यादवचा (Aaradhya Yadav) समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीनं जखमी वासू वत्सच्या जागी आराध्यचा समावेश करण्यास परवानगी दिली आहे. वासूचे स्नायू दुखावले असून तो वर्ल्ड कपमधील पुढील सामने खेळू शकणार नाही.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान खेळाडूंच्या समावेशासाठी आयीसीच्या तांत्रिक समितीची मान्यता आवश्यक असते. या मान्यतेनंतरच एखाद्या खेळाडूचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. भारतीय टीममधील नवा चेहरा आराध्य हा विकेट किपर बॅटर आहे. त्याचे कोच आणि माजी क्रिकेटपटू अजय शर्मा यांनी त्याचं 'नॉट आऊट बॅटर' असं नाव ठेवलं आहे.
आराध्यनं वेस्ट इंडिज विरूद्ध वर्ल्ड कप वॉर्म अप मॅच खेळली होती. त्या मॅचमध्ये त्यानं 40 बॉलमध्ये 42 रन केले होते. आराध्यचे वडील दिल्ली पोलिसांमध्ये निरिक्षक आहेत. त्याचा मोठा भाऊ अंचित यादव देखील क्रिकेटपटू आहे. आराध्यनं अंडर 19 आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध अर्धशतक झळकावले होते.
रवी शास्त्रींच्या इशाऱ्याला गांगुलीचं उत्तरं, रणजी ट्रॉफीच्या तारखेची केली घोषणा
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) दिलेल्या सल्ल्याचा आराध्यवर मोठा प्रभाव पडला आहे. 'तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आणि परिस्थितीमध्ये खेळावे लागते. त्यावेळी देशासाठी एकजूट होऊन खेळणे आवश्यक आहे. ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही दबावाचा फार विचार न करता खेळलात तर आत्मविश्वास वाढेल,' असा सल्ला रोहितनं आराध्यला दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.