विराटसोबत 'टीम इंडिया'कडून खेळलेल्या क्रिकेटपटूची 30व्या वर्षी निवृत्ती

विराटसोबत 'टीम इंडिया'कडून खेळलेल्या क्रिकेटपटूची 30व्या वर्षी निवृत्ती

विराट कोहली (Virat Kohli)सोबत टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या तन्मय श्रीवास्तव (Tanmay Srivastav)याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : विराट कोहली (Virat Kohli)सोबत टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या तन्मय श्रीवास्तव (Tanmay Srivastav)याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या 30व्या वर्षीच तन्मयने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या नेतृत्वात 2008 साली झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला होता. तन्मय श्रीवास्तवने त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन केले होते. डावखुऱ्या तन्मयने 2008 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 52.40च्या सरासरीने 262 रन केले होते.

तन्मय श्रीवास्तवने अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये शानदार खेळी केली होती. फायनलमध्ये तन्मयने 46 रनची खेळी केली होती, पण कमी स्कोअरच्या या मॅचमध्ये तन्मयची हीच खेळी महत्त्वाची ठरली होती. तन्मयच्या या खेळीमुळे भारताने 12 रनने वर्ल्ड कप फायनल जिंकली होती. वर्ल्ड कप विजयानंतर तन्मयची कारकिर्द बहरली नाही. त्याचे साथीदार विराट कोहली आणि रविंद्र जडेजा भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

तन्मय श्रीवास्तव ने लिया संन्यास

तन्मयला आयपीएलमध्येही मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली नाही. पंजाबच्या टीमने त्याला टीममध्ये घेतलं होतं, पण त्याला फक्त 3 मॅच खेळता आल्या. 8 च्या सरासरीने त्याने फक्त 8 रन केले. 2009 नंतर त्याला कोणत्याच आयपीएल टीमने संधी दिली नाही.

तन्मयने 90 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 34 पेक्षा जास्तच्या सरासरीने 4,918 रन केले आहेत. तसंच त्याने 44 लिस्ट-ए मॅचमध्ये 44 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1,728 रन केले. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 28 पेक्षा जास्तच्या सरासरीने 649 रन केले होते.

Published by: Shreyas
First published: October 24, 2020, 5:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या