Home /News /sport /

U19 World Cup, IND vs IRE : टीम इंडियाला आज दुसऱ्या विजयाची संधी, कधी आणि कुठे पाहाल Live Streaming

U19 World Cup, IND vs IRE : टीम इंडियाला आज दुसऱ्या विजयाची संधी, कधी आणि कुठे पाहाल Live Streaming

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup) टीम इंडियाची दुसरी मॅच आज (बुधवार) आयर्लंड विरुद्ध होणार आहे.

    मुंबई, 19 जानेवारी : पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup) टीम इंडियाची दुसरी मॅच आज (बुधवार) आयर्लंड विरुद्ध होणार आहे. पहिली मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आयर्लंड विरुद्धच्या सामन्याीत त्यांचे पारडे जड आहे. कॅप्टन यश ढूलनं (Yash Dhull) आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. त्याच्याकडून या सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. हरनूर सिंह आणि अंगकृष रघूवंशी हे ओपनर आफ्रिकेविरुद्ध झटपट आऊट झाले होते. मिडल ऑर्डरवर दबाव येऊ नये म्हणून त्यांना भक्कम सुरूवात करून द्यावी लागेल. हरनूरनं आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक 251 रन काढले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावले होते.  निशांत सिधू, राज बावा आणि कुशल तांबे या मिडल ऑर्डरच्या खेळाडूंकडूनाही उपयुक्त खेळ खेळावा लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय बॉलर्सनी दमदार कामगिरी केली होती. विकी ओस्तवालने 28 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तर राज बावाने 47 रन देत 4 विकेट्स घेतल्या. महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगरगेकरला फक्त 1 विकेट मिळाली होती. ही कामगिरी उंचावण्याचा त्याचा प्रयत्न असेल. 155 किमी वेगाने बॉलिंग करणारा पाकिस्तानी संशयात, ICC करणार चौकशी भारत विरुद्ध आयर्लंड सामना किती वाजता सुरू होणार? भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. भारत विरुद्ध आयर्लंड सामना कुठे होईल? भारत विरुद्ध आयर्लंड सामना वेस्ट इंडिजमधील त्रिनिदादच्या तोरबा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारत- आयर्लंड यांच्यातील लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल? भारत- आयर्लंड यांच्यातील लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येऊ शकेल. भारत-आयर्लंड सामन्याचे Live Streaming कुठे पाहता येईल? भारत-आयर्लंड सामन्याचे Live Streaming हॉटस्टारवर पाहता येईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india

    पुढील बातम्या