मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Under 19 World Cup: मॅच सुरू असताना भूकंपाचा धक्का, जमीन थरारली तरी खेळ सुरू! पाहा VIDEO

Under 19 World Cup: मॅच सुरू असताना भूकंपाचा धक्का, जमीन थरारली तरी खेळ सुरू! पाहा VIDEO

क्रिकेट मॅचला पाऊस किंवा वादळाचा फटका बसलेलं आपण अनेकदा अनुभवलं आहे. पण लाईव्ह मॅच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला, हे कदाचित यापूर्वी कधी ऐकलं नसेल.

क्रिकेट मॅचला पाऊस किंवा वादळाचा फटका बसलेलं आपण अनेकदा अनुभवलं आहे. पण लाईव्ह मॅच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला, हे कदाचित यापूर्वी कधी ऐकलं नसेल.

क्रिकेट मॅचला पाऊस किंवा वादळाचा फटका बसलेलं आपण अनेकदा अनुभवलं आहे. पण लाईव्ह मॅच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला, हे कदाचित यापूर्वी कधी ऐकलं नसेल.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जानेवारी : क्रिकेट मॅचला पाऊस किंवा वादळाचा फटका बसलेलं आपण अनेकदा अनुभवलं आहे. पण लाईव्ह मॅच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला, हे कदाचित यापूर्वी कधी ऐकलं नसेल. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) स्पर्धेतील एका मॅचच्या दरम्यान हा प्रकार प्रत्यक्षात घडला. झिम्बाब्वे विरूद्ध आयर्लंड (Zimbabwe vs Ireland) यांच्यात ही मॅच होत होती. त्यावेळी झालेल्या भूकंपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय झाला प्रकार?

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झिम्बाब्वे विरूद्ध आयर्लंड यांच्यात प्लेट ग्रुपमधील 9 व्या क्रमांकाचा सामना झाला. या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं पहिल्यांदा बॅटींग केली. पहिल्या इनिंगमध्येच भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. झिम्बाब्वेच्या इनिंगमधील सहाव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. आयर्लंडकडून मॅथ्यू हम्फ्रे हा स्पिनर त्यावेळी बॉलिंग करत होता. त्याच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर भूकंपानं जमीन हादरली.

या मॅचच्या लाईव्ह ब्रॉडकास्टसाठी मैदानातील समोरच्या बाजूला लावण्यात आलेला कॅमेरा भूकंपामुळे हादरला. त्यामध्ये ही घटना रेकॉर्ड झाली. खेळाडूंना मात्र हा धक्का जाणवला नाही. भूकंपाचा हादरा जाणवत असतानाही मॅच सुरू होती. झिम्बाब्वेचा बॅटर ब्रायन बेनेटनं पाचवा बॉल मिड विकेटच्या दिशेनं खेळून काढला. तर पुढच्या बॉलवर चौकार लगावला.

कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणवले धक्के

या मॅचची कॉमेंट्री बॉक्समध्येही भूकंपाचा धक्का जाणवला. 'मला खात्री आहे की आता भूकंपचा धक्का बसला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये हा धक्का जाणवला. आमच्या पाठीमागून रेल्वे जात आहे, असं वाटलं. क्विन्स पार्क ओव्हलवर संपूर्ण मीडिया सेंटर हलत होतं,' अशी प्रतिक्रिया या मॅचमधील कॉमेंटेटर एण्ड्रयू लियोनार्ड यांनी व्यक्त केली.

U19 World Cup : भारताची सेमीफायनलमध्ये धडक, बांग्लादेशला चारली धूळ!

'क्रिकेट आयर्लंड'नंही भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते विकेटचे सेलिब्रेशन नव्हते, तर भूकंपाचा धक्का होता. त्रिनिदादच्या समुद्र किनाऱ्याजवळ 5.1 रिश्टर क्षमतेचा भूकंप जाणवला, असे ट्विट त्यांनी केले.

आयर्लंडचा विजय

झिम्बाब्वे विरूद्ध आयर्लंड मॅचवर भूकंपाचा कोणताही परिणाम झाला नाही. संपूर्ण मॅच व्यवस्थित पार पडली.  झिम्बाब्वेनं पहिल्यांदा बॅटींग करत 166 रन केले. आयर्लंडनं 167 रनचं आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. आयर्लंडकडून जॅक डिक्सननं नाबाद 78 रन केले.

First published:

Tags: Cricket news, Earthquake, Live video viral