Home /News /sport /

जल्लोष तर होणारच! वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये जाताच अफगाणिस्तानचे जोरदार सेलिब्रेशन, VIDEO

जल्लोष तर होणारच! वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये जाताच अफगाणिस्तानचे जोरदार सेलिब्रेशन, VIDEO

अफगाणिस्तानच्या अंडर-19 क्रिकेट टीमनं (Afghanistan U19 Cricket Team) अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

    मुंबई, 28 जानेवारी : अफगाणिस्तानच्या अंडर-19 क्रिकेट टीमनं (Afghanistan U19 Cricket Team) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) या टीमनं थेट सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्ताननं क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेवर 4 रननं सनसनाटी विजय मिळवत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानातच जोरदार सेलिब्रेशन केले. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटींग करत फक्त 134 रन केले होते. त्यामुळे श्रीलंका सहज विजय मिळवेल, असा सर्वांचा अंदाज होता. पण, अफगाण  बॉलर्सनं या धावसंख्येचंही यशस्वी संरक्षण केलं. श्रीलंकेची इनिंग 46 ओव्हरमध्ये 130 रनवर संपुष्टात आली. या विजयानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू चांगलेच इमोशनल झाले होते. त्यांनी मैदानातच जल्लोष सुरू केला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात गोल तयार करत ATTAN हा त्यांचा पारंपारिक डान्स केला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अफगाणिस्तानची सेमी फायनलमध्ये 1 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरूद्ध मॅच होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल आज (शुक्रवार) होणार असून यामध्ये पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी (Pakistan vs Australia) होईल. तर शनिवारी होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाची लढत बांगलादेशी (India vs Bangladeh) होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Cricket, Video viral

    पुढील बातम्या