Home /News /sport /

U19 World Cup : श्रीलंकेवर खळबळजनक विजय मिळवत अफगाणिस्तानची सेमी फायनलमध्ये धडक

U19 World Cup : श्रीलंकेवर खळबळजनक विजय मिळवत अफगाणिस्तानची सेमी फायनलमध्ये धडक

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या (Under 19 World Cup 2022) क्वार्टर फायनलमध्ये खळबळजनक निकालाची नोंद झाली आहे. गुरूवारी रात्री उशीरा झालेल्या दुसऱ्या क्वर्टर फायनलमध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा (Afghanistan vs Sri Lanka) पराभव केला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या (Under 19 World Cup 2022) क्वार्टर फायनलमध्ये खळबळजनक निकालाची नोंद झाली आहे. गुरूवारी रात्री उशीरा झालेल्या दुसऱ्या क्वर्टर फायनलमध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा (Afghanistan vs Sri Lanka) 4 रननं पराभव केला. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटींग करत फक्त 134 रन केले होते. पण, त्यांच्या बॉलर्सनं या धावसंख्येचंही यशस्वी संरक्षण केलं. श्रीलंकेची इनिंग 46 ओव्हरमध्ये 130 रनवर संपुष्टात आली. अफगाणिस्तानकडून अब्दूल हादीनं सर्वात जास्त 37 रन केले. त्याचबरोबर नूर अहमदनं ऑल राऊंड कामगिरी केली. त्याने पहिल्यांदा 33 बॉलमध्ये 30 रनची खेळी केली. त्यानंतर बॉलनं कमाल करत 20 रनमध्ये 1 विकेट घेतली. अल्लाह नूरनं 25 तर नंगोलिया खरोटे याने 13 रन काढले. अफगाणिस्तानचा अन्य कोणताही खेळाडू दोन अंकी रन करू शकला नाही. U19 World Cup : इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक, वाचा कधी आहे भारत आणि पाकिस्तानची लढत अफगाणिस्ताननं श्रीलंकेला 135 रनचं माफक लक्ष्य दिले होते. पण, त्यांच्या बॉलर्सनी ते लक्ष्य डोंगरासारखे केले. त्यांनी सुरूवातीलाच श्रीलंकेच्या झटपट विकेट्स घेत अडचणी वाढवल्या. एकवेळेस तर श्रीलंकेची अवस्था 7 आऊट 43 अशी झाली होती. कॅप्टन दुनिथनं 34 तर रवीन डी सिल्वानं 21 रन करत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेचा स्कोअर 112 होता तेव्हा कॅप्टन आऊट झाला. त्यानंतर थोड्याच वेळात रवीन देखील आऊट झाला. अखेर श्रीलंकेची टीम 130 रनवर ऑल आऊट झाली. विनूजा रनूपूल 11 रन काढून नाबाद राहिला. तर ओपनिंग बॅटर चामिंदूनं 16 रन केले. त्यांच्या शिवाय अन्य कोणत्याही श्रीलंकन बॅटरनं दोन अंकी रन केले नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Cricket, Sri lanka

    पुढील बातम्या