Home /News /sport /

युवराजला 6 वेळा आऊट करणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती, मैदानातच रडला

युवराजला 6 वेळा आऊट करणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती, मैदानातच रडला

पाकिस्तानचा फास्ट बॉलर उमर गुल (Umar Gul) याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 36 वर्षांच्या उमर गुलने पाकिस्तान (Pakistan) साठी 47 टेस्ट, 130 वनडे आणि 60 टी-20 मॅच खेळल्या.

    लाहोर, 17 ऑक्टोबर : पाकिस्तानचा फास्ट बॉलर उमर गुल (Umar Gul) याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 36 वर्षांच्या उमर गुलने पाकिस्तान (Pakistan) साठी 47 टेस्ट, 130 वनडे आणि 60 टी-20 मॅच खेळल्या. पाकिस्तानच्या नॅशनल टी-20 स्पर्धेत बलुचिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर गुलने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शुक्रवारी त्याची टीम या स्पर्धेतून बाहेर झाली. पेशावरमध्ये राहणाऱ्या उमर गुलने 2003 साली वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2002 सालच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही गुल खेळला होता. मैदानातच रडला गुल जवळपास 20 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर संन्यास घेताना उमर गुल मैदानातच रडला. कुटुंब, मित्र आणि आपल्या प्रशिक्षकांचे आभार मानत असतानाच गुल भावुक झाला. यावेळी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही खेळण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. 2003 मध्ये मिळाली संधी 2003 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर उमर गुलला पहिल्यांदा टीममध्ये संधी मिळाली. वसीम अक्रम आणि वकार युनूस या दिग्गजांचा काळ संपत असतानाच उमर गुलचं टीममध्ये आगमन झालं. गुलने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 987 विकेट घेतल्या. यॉर्कर बॉल टाकण्यात पटाईत असणाऱ्या उमर गुलने अनेक बॅट्समनची भंबेरी उडवून दिली. उमर गुलने युवराज सिंगलाही बराच त्रास दिला. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये गुलने 6 वेळा युवराज सिंगची विकेट घेतली. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला फायनलपर्यंत पोहोचवण्यात गुलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत त्याने पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. बराच काळ उमर गुल आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध 6 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या