T20 स्पर्धेत 314 धावांची त्सुनामी : रोहित आणि गेलला जमलं नाही ते यांनी करून दाखवलं

T20 स्पर्धेत 314 धावांची त्सुनामी : रोहित आणि गेलला जमलं नाही ते यांनी करून दाखवलं

Cricket : टी20 सामन्यात एका गोलंदाजाच्या तीन षटकांत 82 धावा कुटल्या तर सामना 304 धावांनी जिंकला.

  • Share this:

किगाली, 19 जून : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी20 सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम युगांडाच्या महिला संघाच्या नावावर जमा झाला. त्यानी 20 षटकात 2 बाद 314 धावा केल्या. युगांडाने माली महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली. टी20 महिला आणि पुरुष संघाकडून झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रोसकोविया अलाको आणि इमिक्युलेट नाकीसुयी यांनी 5.4 षटकांतच 82 धावांची सलामी दिली. मात्र नाकीसुयी 34 धावांवर बाद झाली.

युगांडाची कर्णधार रिता मुसामालीने अलाकोसोबत जबरदस्त भागिदारी केली. त्यांनी या खेळीत केवळ एक षटकार मारला तर तब्बल 34 चौकार लगावले. या सामन्यात अवांतर धावांची खैरात माली संघाने केली. वाईड आणि नो बॉल मिळून तब्बल 60 धावा दिल्या. यात 30 नो बॉल आणि 28 वाईड बॉलचा समावेश होता. अलाको आणि मुसामाली दोघींनी शतक पूर्ण केलं. अलाकोनं 71 चेंडूत 116 धावा केल्या. तर कर्णधार मुसामालीनं 61 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या.

मालीची गोलंदाज ओउमो सोऊच्या गोलंदाजीवर युगांडाने तुफान फटकेबाजी केली. तिच्या तीन षटकात तब्बल 82 धावा कुटल्या. कोणत्याही गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इतक्या धावा दिलेल्या नाहीत. तिला एकच विकेट घेता आली.

युगांडाने दिलेल्या 314 धावांचं आव्हानासमोर मालीने केवळ 10 धावा केल्या. माली संघाला युगांडाने 11.1 षटकांत 10 धावांत गुंडाळले. त्यांचे सहा फलंदाज खातंही उघडू शकले नाहीत. या सामन्यात युगांडाने 304 धावांनी विजय मिळवून टी20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. याआधी माली संघाने रवांडाविरुद्धसुद्धा अशीच खराब कामगिरी केली होती. त्या सामन्यात त्यांचा संघ फक्त 6 धावा करू शकला होता.

World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनला, पण ती प्रियकरासोबत पळाली

First published: June 20, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading