Home /News /sport /

U19 World Cup, IND vs SA: टीम इंडियाच्या कॅप्टनननं घेतलेल्या जबरदस्त कॅचनंतर फिरली मॅच, VIDEO

U19 World Cup, IND vs SA: टीम इंडियाच्या कॅप्टनननं घेतलेल्या जबरदस्त कॅचनंतर फिरली मॅच, VIDEO

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) स्पर्धेची सुरूवात टीम इंडियाने विजयाने केली आहे. या मॅचमध्ये कॅप्टन यश ढूलनं (Yash Dhull) घेतलेल्या जबरदस्त कॅचनं मॅचचं चित्र बदललं.

    मुंबई, 16 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) स्पर्धेची सुरूवात टीम इंडियाने विजयाने केली आहे. भारताने या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 45 रननं पराभव केला. टीम इंडियाचा कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) या विजयाचा हिरो ठरला. त्याने सुरुवातीला भारताकडून सर्वाधिक 82 रन काढले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फॉर्मातील खेळाडूचा जबरदस्त कॅच घेत मॅचचं चित्र बदललं. राज बावानं टाकलेल्या 36 व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसनं मिड ऑफच्या दिशेनं बॉल टोलावाला. त्यावेळी यशने पुढे झेपावत सुरेख कॅच पकडला. यशनं बॉल नीट पकडला आहे का हे मैदानातील दोन्ही अंपायरना समजले नाही. त्यांनी थर्ड अंपायरची मदत मागितली. थर्ड अंपायरनं ब्रेविस आऊट असल्याचा निर्णय दिला. ब्रेव्हिस त्यावेळी 65 रनवर खेळत होता आणि आफ्रिकेची मॅचवर पकड होती. तो आऊट झाल्यानंतर भारतीय टीमनं कमबॅक केले. आफ्रिकेच्या शेवटच्या 6 विकेट्स 59 रनमध्ये घेत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. भारताकडून विकी ओस्तवालनं फक्त 28 रन देत 5 विकेट्स घेतल्या. त्यापूर्वी  टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 11 धावांवर टीम इंडियानं सलामीवीर तंबूत परतले. यानंतर शेख रशीद आणि कॅप्टन यश धुल यांनी धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. Ashes Series: इंग्लंडला लाज वाचवण्याची शेवटची संधी, होबार्ट टेस्टमध्ये नामुश्की टाळणार? भारताकडून कॅप्टन यश धुलने सर्वाधिक 82 रन  केल्या. त्याचवेळी निशांत सिंधू 27 रन, राज बावा 13 रन आणि कौशल तांबे 35 रन काढले. त्यांच्या प्रयत्नामुळे टीम इंडियानं 232 पर्यंत मजल मारली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, South africa, Team india

    पुढील बातम्या