Home /News /sport /

U19 World Cup : भारत-पाकिस्तान क्वार्टर फायनलमध्ये, वाचा कधी होणार एकमेकांशी सामना

U19 World Cup : भारत-पाकिस्तान क्वार्टर फायनलमध्ये, वाचा कधी होणार एकमेकांशी सामना

अंडर 19 वर्ल्ड कपमधील (U19 World Cup 2022) साखळी सामने संपले आहेत. क्वार्टर फायनलमधील 8 टीम आता ठरल्या आहेत.

    मुंबई, 23 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमधील (U19 World Cup 2022) साखळी सामने संपले आहेत. क्वार्टर फायनलमधील 8 टीम आता ठरल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही टीम शेवटच्या आठमध्ये दाखल झाल्या आहेत.  त्यामुळे त्यांची लढत कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारत -पाकिस्तान या दोन्ही टीमनं या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी स्पर्धेतील तीन्ही सामने जिंकले आहेत. आता क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी 28 जानेवारी रोजी होणार आहे. तर भारताची लढत 29 जानेवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. अन्य क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (27 जानेवारी) आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (26 जानेवारी) आमने-सामने येतील. भारताने आजवर सर्वाधिक 4 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. यंदाही भारतीय टीम वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाने क्वर्टर फायनल जिंकली तर सेमी फायनलमध्ये त्यांची लढत श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील विजेत्या टीमशी होईल. याचाच अर्थ भारत आणि पाकिस्तानच्या टीम सेमी फायनलमध्ये एकमेकांशी खेळणार नाहीत. विराट कोहलीला कॅप्टनसी सोडावी लागली, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा! VIDEO भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीमनं सेमी फायनल जिंकली तर फायनलमध्ये त्यांची एकमेकांशी लढत होऊ शकते. या वर्ल्ड कपची फायनल 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. क्रिकेट विश्वातील या कट्टर प्रतिस्पर्धी टीममध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये आजवर 10 सामने झाले असून दोन्ही टीमनं प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, Pakistan, Team india

    पुढील बातम्या