Home /News /sport /

U19 World Cup : अर्धा डझन खेळाडू कोरोनाग्रस्त झाल्यानंतरही टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी, सुपर लीगमध्ये दिमाखात प्रवेश

U19 World Cup : अर्धा डझन खेळाडू कोरोनाग्रस्त झाल्यानंतरही टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी, सुपर लीगमध्ये दिमाखात प्रवेश

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) टीम इंडियानं जबरदस्त कामगिरी केली आहे. आयर्लंड विरुद्ध बुधवारी झालेल्या मॅचपूर्वी भारतीय टीमवर कोरोना अटॅक झाला. त्यानंतरही टीमनं मोठा विजय मिळवला.

    मुंबई, 20 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) टीम इंडियानं जबरदस्त कामगिरी केली आहे. आयर्लंड विरुद्ध बुधवारी झालेल्या मॅचपूर्वी भारतीय टीमवर कोरोना अटॅक झाला. टीममधील अर्धा डझन खेळाडूंना आयसोलेशनमध्ये जावं लागलं. त्यामध्ये कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) आणि व्हाईस कॅप्टन एसके रशिदचाही समावेश होता. त्यानंतरही भारतीय टीमनं जबरदस्त कामगिरी करत आयर्लंडचा 174 रनने दणदणीत पराभव केला या विजयासह टीमनं वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी या जोडीने टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 164 रनची पार्टनरशिप केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत हे दोघंही फेल गेले होते. आयर्लंड विरुद्ध कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन दोघेही टीमच्या बाहेर असताना त्यांनी दमदार खेळ केला. हरनूरनं 88 तर रघुवंशीनं 79 रन केले. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरनंही या चांगल्या सुरूवातीचा फायदा घेतला. राज बावा, निशांत सिंधू आणि राजवर्धन हंगरगेकर या तिघांनीही उपयुक्त खेळी केली. राजवर्धनननं फक्त 17 बॉलमध्ये 1 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं नाबाद 39 रन काढले. त्याच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियानं 50 ओव्हर्समध्ये 5 आऊट 307 रन केले. आयर्लंडला 308 रनचे आव्हान पेलवले नाही. त्यांची संपूर्ण टीम फक्त 133 रन काढून ऑल आऊट झाली. भारतीय बॉलर्सनी अचूक मारा करत फक्त 39 ओव्हर्समध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम इंडियाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या मॅचमध्ये 45 रनने पराभव केला होता. आता त्यापाठोपाठ आयर्लंडला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये प्रवेश केला आहे. अर्धा डझन खेळाडू बाहेर त्यापूर्वी, टीम इंडियाच्या  17 खेळाडूंपैकी सहा खेळाडूंना या मॅचमधून वगळण्यात आलं. कॅप्टन यश ढूल, व्हाईस कॅप्टन शेख रशीद आणि त्यांचे चार सहकारी कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. धूल आणि रशीद व्यतिरिक्त, सिद्धार्थ यादव, मानव पारख, वासू वत्स, आराध्या यादव यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे टीम इंडियाला उर्वरित सर्व 11 खेळाडूंसह मैदानात उतरावं लागलं. U-19 World Cup 2022: टीम इंडियाला मोठा झटका, भारताच्या कर्णधारासह पाच खेळाडू Corona पॉझिटिव्ह
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या