मुंबई, 27 जानेवारी : जॅकब बेथलच्या दमदार बॅटींगच्या जोरावर इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला (England vs South Africa) 6 विकेट्सनं पराभूत केले. या विजयासह इंग्लंडनं अंडर 19 वर्ल्ड कपची (Under 19 World Cup) सेमी फायनल गाठली आहे. बेथेलनं सुरूवातीला चांगली बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेला 209 रनवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 88 रन करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरूवात संथ झाली. इनिंगमधील पहिला फोर चौथ्या ओव्हरमध्ये आला. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये जोशुआ बॉयडेन आऊट झाला. त्यापाठोपाठ एथान जॉन आऊट झाल्यानं दक्षिण आफ्रिकेची अवस्था 2 आऊट 21 झाली होती. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि गेहार्डस मारी यांनी इनिंग सावरली. त्यांनी 55 रनची भागिदारी केली.
ब्रेविसनं सलग चौथ्या मॅचमध्ये 50 पेक्षा जास्त रन केले. त्याचं शतक फक्त 3 रननं हुकलं. ब्रेविस आऊट होताच आफ्रिकेनं एक रनमध्ये तीन विकेट गमावल्या. रेहान अहमदनं 48 रन देत 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून बेथेलनं अंडर 19 वर्ल्ड कपमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने फक्त 20 बॉलमध्ये 50 रन पूर्ण रेले. तो 42 बॉलमध्ये 88 रन काढून आऊट झाला तेव्हा इंग्लंडचा विजय जवळपास नक्की झाला होता.
IPL मध्ये मोठी कमाई आता टीम इंडियाचं तिकीट, 21 वर्षांचा बॉलर का खास आहे?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीमनी एकही सामना न गमावता क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानची या फेरीतील लढत ऑस्ट्रेलिया विरूद्ध 28 जानेवारी रोजी होणार आहे. तर भारतीय टीम 29 जानेवारी रोजी बांगलादेश विरूद्ध क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. भारतीय टीमला या स्पर्धेत कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. टीममधील 6 जण कोरोनामुळे आयसोलेशनमध्ये आहेत. बांगलादेशविरुद्धच्या लढतीमध्ये यापैकी बहुतेक जण बरे होतील, अशी फॅन्सना अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.